प्रताप सरनाईकांच्या इमारत दंडमाफीविरोधात भाजप आक्रमक, शनिवारी घेणार राज्यपालांची भेट

प्रताप सरनाईकांच्या इमारत दंडमाफीविरोधात भाजप आक्रमक, शनिवारी घेणार राज्यपालांची भेट

प्रताप सरनाईकांच्या इमारत दंडमाफीविरोधात भाजप आक्रमक, शनिवारी घेणार राज्यपालांची भेट

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील छाबय्या इमारतीचा दंड राज्य मंत्रिमंडळात माफ करण्यात आला आहे. सरनाईकांना अशा प्रकारे दंडमाफी देणं अयोग्य असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लक्ष घालावे अशी मागणी भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पटील यांच्या नेतृत्वामध्ये भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांची शनिवारी भेट घेण्यासाठी जाणार आहेत. राज्यपालांना सरनाईक यांच्या इमारतीचा दंड माफीविरोधात लक्ष घालण्याची विनंती भाजप नेत्यांकडून करण्यात येणार आहे.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या इमारतीचा कर आणि दंड माफ करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावर सर्व मंत्र्यांनी एकमत करुन दंड माफ केला आहे. यामुळे छाबय्या इमारतीचा हजारो कोटींचा दंड माफ झाला आहे. सरनाईकांना दिलेली दंडमाफी अयोग्य असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटलं आहे. एका आमदारावर राज्य सरकार मेहेरबान असल्याची टीका भाजपकडून करण्यात येत आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात भाजपचे शिष्टमंडळ राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. यावेळी भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार आशिष शेलार आणि अन्य प्रमुख नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत.

सरनाईकांवर राज्य सरकार मेहेरबान

राज्यमंत्रिमंडळ बैठकीमध्ये आमदार प्रताप सरनाईक यांच्या इमारतीचा दंड माफ करण्यात आला आहे. तसेच इमारतीचा दंड माफ केला असून इमारतीला भोगवाटा प्रमाणपत्र देण्याचा आदेश देण्यात आला आहे. महापालिकेला भोगवाटा प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेनेच्या आमदारासाठी राज्य मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदाच निर्णय घेण्यात आला आहे. यावरुन विरोधकांनी मात्र टीका करण्यास सुरुवात केली आहे.


हेही वाचा : विहंग गार्डनमध्ये एक इंच जरी अनधिकृत बांधकाम झाले असेल तर राजीनामा देतो – सरनाईक

First Published on: January 21, 2022 8:33 PM
Exit mobile version