BJP Delegation : भाजप-शिवसेना संघर्ष वाढणार, किरीट सोमय्यांवरील हल्ला प्रकरणी BJP शिष्टमंडळ दिल्लीला रवाना

BJP Delegation : भाजप-शिवसेना संघर्ष वाढणार, किरीट सोमय्यांवरील हल्ला प्रकरणी BJP शिष्टमंडळ दिल्लीला रवाना

BJP Delegation : भाजप-शिवसेना संघर्ष वाढणार, किरीट सोमय्यांवरील हल्ला प्रकरणी BJP शिष्टमंडळ दिल्लीला रवाना

राज्यात भाजप आणि शिवसेनेमधील संघर्ष वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर मुंबईत हल्ला झाला आहे. या प्रकरणी भाजप शिष्टमंडळ दिल्लीकडे रवाना झाले असून गृहसचिवांची भेट घेणार आहेत. भाजप-शिवसेनेतील संघर्ष आता दिल्ली दरबारी केला आहे. शनिवारी किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला. हा हल्ला प्राणघातक होता असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला असून त्यांच्या गाडीवर दगडफेक आणि चप्पलफेक झाली आहे.

माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी खार पोलीस स्टेशनसमोर हल्ला झाला. या हल्ल्याची माहिती आणि शिवसैनिकांची तक्रार करण्यासाठी भाजप शिष्टमंडळ दिल्लीकडे रवाना झाले आहेत. केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची भेट घेणार असून त्यांना हल्ल्याबाबत माहिती देण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता शिष्टमंडळ नॉर्थ ब्लॉकमध्ये केंद्रीय गृहसचिवांना भेटणार आहेत. यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीसुद्धा भेट शिष्टमंडळ घेऊ शकते.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भाजप शिष्टमंडळ दिल्लीकडे रवाना झाले असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की, किरीट सोमैय्या मारहाण प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी मुंबई भाजपचे शिष्टमंडळ दिल्लीसाठी मुंबईहून रवाना, मिहिर कोटेचा, अमित साटम, पराग शाह, राहुल नार्वेकर, विनोद मिश्रा आणि किरीट सोमैया. नॉर्थ ब्लॉक दिल्ली येथे केंद्र सरकारचे गृह सचिव यांना भेटणार.

सरकार पुरस्कृत हल्ला – सोमय्या

माझ्यावर झालेला हल्ला हा सरकार पुरस्कृत होता असा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे हे यासाठी जबाबदार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले. शिवसैनिकांनी मला जीवे मारण्याचा तिसरा प्रयत्न केला आहे. पहिला वाशिम, पुणे आणि आता मुंबईतील खार पोलीस स्टेशनसमोर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. गाडीवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये गाडीची काच फुटली असून सोमय्यांनाही जखम झाली आहे. माझी हत्या करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.


हेही वाचा : लाऊडस्पीकरबाबत नियमावली बनवण्यासाठी ठाकरे सरकारची आज सर्वपक्षीय बैठक, राज ठाकरेंची उपस्थिती नाही

First Published on: April 25, 2022 8:36 AM
Exit mobile version