OBC समाजाचा अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा घेणार का?, भाजपचा राष्ट्रवादीला सवाल

OBC समाजाचा अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा घेणार का?, भाजपचा राष्ट्रवादीला सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री यांनी ओबीसींविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. या वक्तव्यामुळे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. आव्हाडांच्या वक्तव्याचा भाजपकडून जाहीर निषेधही कऱण्यात आला आहे. ओबीसींविरोधात केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ शेअर करत भाजपने जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या व्हिडीओमध्ये माझा ओबीसी समाजावर फार विश्वास नाही असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे.

राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी क्रींतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात संबोधित करताना आव्हाड यांनी ओबीसींच्या भावना दुखावणारे वक्तव्य केलं आहे. ओबीसींवर माझा फारसा विश्वास नाही. कारण जेव्हा मंडळ आयोग आला या आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होते. परंतु जेव्हा लढण्याची वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात आले नाही. कारण त्यांना लढायचं नसतं असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

तसेच त्यांनी पुढे म्हटलं आहे की, ओबीसींवरती ब्राम्हण्यवादाचा इतका पगडा बसलाय की, आपण श्रेष्ठ आहोत पण त्यांना हे माहिती नाही की, ४ पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला आणि पणजोबाला देवळात येऊ द्यायचे नाही. हे सगळे विसरलेत मात्र आता आरक्षणाच्या निमित्ताने पुढे येत आहेत. परंतु नुसतं घरात बसून व्हॉट्सअप करुन चालणार नाही त्यासाठी रस्त्यावर यावं लागेल असे जितेंद्र आव्हाड यांनी कार्याक्रमात म्हटलं आहे. यावरुन भाजपने निषेध केला आहे.

जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा घेणार का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भाजपने राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच आव्हा़डांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला आहे. भाजपच्या अधिकृत ट्विटर पेजवरु आव्हाडांची व्हिडीओ पोस्ट केली आहे. तसेच कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध, ओबीसी समाजाचा अपमान करणारे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस घेणार का? असा सवालही भाजपने केला आहे. NCP च्या मनात OBC समाजाबद्दल एवढा राग का? यासाठीच OBC चे राजकीय आरक्षण घालवलं का? असा प्रश्न भाजपकडून राष्ट्रवादीला करण्यात आला आहे.


हेही वाचा : Nitesh Rane : नितेश राणेंना अटकेपासून दिलासा, 7 जानेवारीला अटकपूर्व जामीन अर्जावर होणार सुनावणी

First Published on: January 4, 2022 12:25 PM
Exit mobile version