Kirit Somaiya Car Attack : पोलीस संरक्षणात ही गुंडगिरी सुरु, जशास तसं उत्तर देणार; सोमय्यांवरील हल्ल्यानंतर फडणवीसांचा इशारा

Kirit Somaiya Car Attack : पोलीस संरक्षणात ही गुंडगिरी सुरु, जशास तसं उत्तर देणार; सोमय्यांवरील हल्ल्यानंतर फडणवीसांचा इशारा

Kirit Somaiya Car Attack : पोलीस संरक्षणात गुंडगिरी सुरु, जशास तसं उत्तर देणार; सोमय्यांवरील हल्ल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शनिवारी रात्री शिवसैनिकांनी हल्ला केला. या घटनेनंतर आता शिवसेना- भाजप पुन्हा आमनेसामने आले असून आरोप- प्रत्यारोप करण्यात येत आहेत. दरम्यान भाजपकडून या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे. किरीट सोमय्यांवरील हल्ल्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. पोलीस संरक्षणामध्ये ही गुंडशाही सुरु असून लोकशाही पायाखाली जात आहे. याला भाजपं आता जशासं तसं उत्तर देणार अशा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तसेच या हल्ल्याप्रकरणी गृहसचिवांची भेट घेत कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

फडणवीस म्हणाले की, किरीट सोमय्यांनी आपल्यावर हल्ला होणार असल्याची पूर्वकल्पना पोलिसांनी दिली होती. मात्र पोलिसांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. पोलिसांच्या संरक्षणामध्ये ही गुंडगिरी सरु असून मुंबई पोलिसांची अब्रू या पोलिसांनी घालवली आहे. लोकशाही पायाखाली घातली जातेय. असा आरोप त्यांनी केला.

रात्रीच्या वेळी एका महिलेला पोलीस कस्टडीमध्ये ठेवता येत नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. असे असताना न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करत नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले. यासंबंधी आज राज्याच्या गृहसचिवांची भेट घेणार आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसारख्या वागणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी करणार आहे. असेही फडणवीस यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, तुम्ही आम्हाला घाबरवू शकत नाही. जशास तसं उत्तर देण्याची धमक आमच्यात आहे. हे सर्व तात्काळ बंद न झाल्यास भाजप आक्रमक भूमिका घेणार, एका महिलेला हे सरकार घाबरलं आणि आख्या मुंबईस वेठीस धरण्याचे काम त्यांनी केले, घोटाळे बाहेर काढणाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न सुरु आहे असा आरोप फडणवीसांनी केला.


हेही वाचा- शिवसैनिकांचा किरीट सोमय्यांच्या गाडीवर हल्ला, काचा फोडल्या, हल्ल्यात सोमय्या जखमी

First Published on: April 24, 2022 8:08 AM
Exit mobile version