भाजप जाती-धर्माच्या नावावर मतदारांना करते आवाहन – रत्नाकर महाजन

भाजप जाती-धर्माच्या नावावर मतदारांना करते आवाहन –  रत्नाकर महाजन

काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन

लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सर्वत्र पहायला मिळत आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात प्रचार-प्रसार करण्याची जय्यत तयारी करताना सर्वच राजकीय पक्ष दिसत आहेत. या प्रचारा दरम्यान रत्नाकर महाजनने मोदींवर टोला घणाघात केला आहे. ‘निवडणुकीच्या राजकारणात जाती-धर्माच्या नावावर मतदारांना आवाहन करणे ही संघ परिवार आणि भाजपाची फार जुनी सवय आहे. २०१४ प्रमाणे याहीवेळी नरेंद्र मोदी आणि भाजपाने तेच करायचे ठरवलेले दिसते. मोदी यांनी अकलुजच्या भाषणात आपण मागासवर्गीय असल्यामुळे काँग्रेस टीका करत असल्याचे म्हटले आहे, हा त्याचाच पुरावा आहे’, असा टोला काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी मोदींना लगावला आहे.

राष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला तेव्हा मोदींनी काय केले?

राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांची जात काढल्यामुळे संघ परिवाराच्या नाकाला फारच मिरच्या झोंबल्या पण याच राष्ट्रपतींची उमेदवारी जाहीर करताना मात्र, भाजपाच्या तडीपार अध्यक्षांनी स्वतः रामनाथ कोविंद यांची जात जाहीर केली होती. हे अजून कोणी विसरलेले नाही. पण हेच राष्ट्रपती जेव्हा वेगवेगळ्या मंदिरात जात होते. तेव्हा तिथले पुजारी त्यांना देवळाच्या गाभाऱ्यात प्रवेश करु देत नव्हते, तेव्हा संघ परिवार आणि भाजपाने ते कसे चालू दिले. आज दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांचा पुळका आलेल्या प्रधानमंत्र्यांनी तेव्हा काय केले?, असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला आहे.


वाचा – मोदींनी केलेली टीका गांभीर्याने घेण्यासारखी नसते – शरद पवार

वाचा – नाशिकच्या रस्त्यांवर मोदी करताहेत सेनेचा प्रचार


 

First Published on: April 18, 2019 3:50 PM
Exit mobile version