‘इंधन दरवाढीवर सरसकट केंद्राकडे बोट दाखवू नये; राज्य सरकारने पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करावा’

‘इंधन दरवाढीवर सरसकट केंद्राकडे बोट दाखवू नये; राज्य सरकारने पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करावा’

सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरवाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत १०० हून अधिक असून डिझेल ९३.५८ रुपये प्रति लीटर झाली आहे. त्यामुळे या इंधन दरवाढीला केंद्र जबाबदार असल्याचे राज्य सरकारकडून म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला प्रत्युत्तर दिले आहे. इंधन दरवाढीवर सरसकट केंद्राकडे बोट दाखवणे चुकीचे आहे. राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करावा आणि जनतेला दिलासा द्यावा, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

नक्की काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

‘इतर राज्याने त्याचे टॅक्स कमी केल्यामुळे तिथे १०० रुपयांच्या आत पेट्रोल आहे. केंद्राला तुम्ही काही म्हणणार असाल तर म्हणा. पण तुम्ही देखील म्हणाना, आम्ही सुद्धा १० रुपयाने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केला. केंद्राने आता ५ रुपये कमी करावा. असे काहीच नाही आहे ना. सगळे द्या द्या. पण त्या द्यासाठी जो कर लागतो, ज्यातून कलेक्शन होते. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणणार की तुम्ही कमी करा. त्यामुळे सतत इंधन दरवाढीवर सरसकट केंद्राने बोट दाखवणे चुकीचे आहे. राज्य सरकारने कर कमी केला तर इंधनाच्या किंमती नियंत्रणात राहतील,’ असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

आजची पेट्रोलची किंमती जाणून घ्या

दिल्ली – ९५.३१ रुपये प्रति लीटर
मुंबई – १०१.५२ रुपये प्रति लीटर
कोलकाता – ९५.२८ रुपये प्रति लीटर
चेन्नई – ९६.७१ रुपये प्रति लीटर
जयपूर – १०१.८८ रुपये प्रति लीटर
बंगळुरू – ९८.४९ रुपये प्रति लीटर
नोएडा – ९२.६७ रुपये प्रति लीटर

आजची डिझेलची किंमत जाणून घ्या

दिल्ली – ८६.२२ रुपये प्रति लीटर
मुंबई – ९३.५८ रुपये प्रति लीटर
कोलकाता – ८९.०७ रुपये प्रति लीटर
चेन्नई – ८९.०७ रुपये प्रति लीटर
जयपूर – ९५.८१ रुपये प्रति लीटर
बंगळुरू – ९१.४१ रुपये प्रति लीटर
नोएडा – ८६.७० रुपये प्रति लीटर


हेही वाचा – राजकीय जोर बैठका सुरूच; आता बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या घरी


 

First Published on: June 7, 2021 1:11 PM
Exit mobile version