…तेव्हा नैतिकता कुठे गेली होती? फडणवीसांनी घेतला ठाकरेंचा खरपूस समाचार

…तेव्हा नैतिकता कुठे गेली होती? फडणवीसांनी घेतला ठाकरेंचा खरपूस समाचार

2019 ला युती तोडून तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार स्थापन केलंत तेव्हा कुठे गेली होती नैतिकता, असं प्रश्न करत फडणवीस यांनी ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला आहे.

आज, 11 मे न्यायालयाचा निकाल हा लोकशाहीमध्ये अपेक्षित निकाल होता, अखेर सत्याचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेच्या मुद्यावरुन आता ठाकरे यांनी घेरलं आहे. 2019 ला युती तोडून तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार स्थापन केलंत तेव्हा कुठे गेली होती नैतिकता, असं प्रश्न करत फडणवीस यांनी ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला आहे. ( Bjp leader Devendra Fadnavis Criticised Uddhav Thackeray over his statement on resignation )

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंना नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार नाही. फडणवीस म्हणाले की, नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, भाजपसोबत निवडून आलात आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेला, तेव्हा नैतिकता कुठे गेली होती. त्यामुळे ठाकरेंना नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार नसल्याचं फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले फडणवीस?

उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवले जाऊ शकत नाही. त्यांनी राजीनामा दिला आहे.

आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष घेणार आहेत, हा सर्वोच्च न्यायालया घेणार नाही

निवडणूक आयोग स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतो, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं

राज्यपालांनी शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा जो निर्णय घेतला, तो योग्य आहे.

एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही

एकनाथ शिंदे यांच्याबाबतक सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्णय दिला आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नसल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा जो निर्णय घेतला, तो सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने विरोधकांची शंका दूर केली

तसचं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापनेसाठी बोलावल्याने हे सरकार कायदेशीर असल्याचं, सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. आधीही आमचं सरकार हे कायदेशीर आणि संविधानिकच होतं, पण काही लोकांना शंका होती त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांची शंका दूर केल्याचं फडणवीस म्हणाले.

 

First Published on: May 11, 2023 3:35 PM
Exit mobile version