अजित पवार यांचा मुलगा जय पवारचे कारनामे उघड करणार; किरीट सोमय्यांचे आव्हान

अजित पवार यांचा मुलगा जय पवारचे कारनामे उघड करणार; किरीट सोमय्यांचे आव्हान

अजित पवार यांचा मुलगा जय पवारचे कारनामे उघड करणार; किरीट सोमय्यांचे आव्हान

मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या कार्यालातील फाईल्स तपासल्याप्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या चांगलेच वादात सापडले आहेत. अशातच किरीट सोमय्या यांनी आता ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा आव्हान दिले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार किरीट सोमय्या यांच्या रडारवर असल्याचे दिसून येत आहे. ‘जय पवार यांचे कारनामे मी लवकरचं उघड करणार’ असल्याचे आव्हान किरीट सोमय्या यांनी केला.

किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात एका माध्यमाशी बोलताना सांगितले की, अजित पवार यांची 1 हजार 55 कोटींची बेनामी संपत्ती घोषित झाली आणि जप्त झाली. आता पुढे बघा काय होतयं ते. अजित पवार यांच्या मुलगा जय पवार याने काय कारनामे केलेत, हेही लवकरचं बाहेर येणार आहेत. असे वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केले. यामुळे किरीट सोमय्या कोणता नवा गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

उद्या रायगड कर्जतला जाऊन त्या काळातील पेशव्यांची, वैजनाथ इथली हिंदू देवस्थानची जमीन सलीम बिलाखियाच्या नावाने कशी गेली याची चौकशी करणार असल्याचेही सोमय्यांनी सांगितले आहे.

किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यातील घोटाळ्यासंदर्भात अजित पवार यांच्यावर आरोप केले होते. बेनामी गुंतवणूक करत, कंपन्यांचे जाळे निर्माण करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना खरेदी केला. तर सर्व नियमांचे उल्लंघन करत पवारांनी हा कारखाना स्वत;लाचा विकला असे किरीट सोमय्या यांनी म्हटले होते.


Virat : राष्ट्रपतींचा अंगरक्षक ‘विराट’ सेवानिवृत्त; राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी प्रेमाने गोंजारून दिला निरोप


First Published on: January 27, 2022 3:12 PM
Exit mobile version