पंकजा मुंडे समर्थकांची मुंबईत भेट घेणार; काय भूमिका घेणार?

पंकजा मुंडे समर्थकांची मुंबईत भेट घेणार; काय भूमिका घेणार?

भाजप नेत्या पंकजा मुंडे आज मुंबईत समर्थकांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार पंकजा मुंडे यांना स्थान मिळालं नाही. प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळातून डावलल्याने मुंडे समर्थकांचं राजीनामा सत्र अद्याप सुरु आहे. त्यामुळे या नाराज समर्थकांची समजूत काढण्यासाठी पंकजा मुंडे आज मुंबईत दाखल झाल्या आहेत.

एकीकडे पंकजा मुंडे पक्ष श्रेष्ठींच्या दिल्लीत भेटीगाठी घेत असताना दुसरीकडे मात्र समर्थकांचं राजीनामा सत्र सुरुच होतं. दरम्यान, पंकजा मुंडे आज नाराज समर्थकांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेणार आहेत. या बैठकीसाठी बीड जिल्ह्यातून निवडक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. आपल्या निवडक कार्यकर्त्यांसोबत चर्चा करुन पंकजा मुंडे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पंकजा मुंडेच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

मुंडे समर्थकांनी आयोजित केलेल्या या बैठकीत पंकजा मुंडे संबोधित करणार आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे या बैठकीत काय भाष्य करतात, तसंच काय निर्णय घेतात? याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.

प्रीतम मुंडेंना डावलून भागवत कराडांना संधी

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात डॉ. प्रीतम मुंडे यांना संधी मिळेल असे अंदाज बांधले जात होते. मात्र, ते अंदाज फोल ठरले. प्रीतम मुंडेंना डावलून अनपेक्षितपणे भागवत कराड यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. मात्र दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या प्रीतम मुंडे यांना डावलून भागवत कराड यांना संधी का दिली गेली? यावर अनेक तर्क लावले जात आहे. भाजपचं अंतर्गत राजकारणाचीही यावरुन चर्चा रंगत आहे. त्यात भागवत कराड हे मुंडे कुंटुबियांचे निकटवर्तीय मानले जातात.

First Published on: July 13, 2021 10:59 AM
Exit mobile version