राज्य सरकारला मराठा समाजाचा आवाज दाबता येणार नाही – प्रविण दरेकर

राज्य सरकारला मराठा समाजाचा आवाज दाबता येणार नाही – प्रविण दरेकर

मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा दिखाऊपणाचा, केवळ तोंडाला पानं पुसण्याचे काम केल्याचे दरेकरांचा आरोप

भाजप मराठा समाजासोबत आहे. मराठा आरक्षणावर अभ्यास करण्यासाठी भाजपने एक समिती स्थापन केली आहे. या समितीद्वारे मराठा आरक्षणातील त्रुटी दूर करत तज्ञ लोकांच्या सहाय्याने लवकरच मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊ असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या समितीत मी, आशिष शेलार, विनायक मेटे, नरेंद्र पाटील आणि श्रीकांत भारतीय यांचा समावेश असल्याची माहिती दरेकर यांनी दिली.

राज्यसरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षणाला दुर्लक्ष करत आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्रांवर आरोप प्रत्यारोप मविआ मधील नेते करत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले, त्याचा कायदा उच्च न्यायालयात टिकवला आणि फडणवीस सरकार सत्तेवर असेपर्यंत सर्वोच्च न्यायालयातही या कायद्याला स्थगिती आली नव्हती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कधीही मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नव्हते. महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा खून केला असल्याची टीका दरेकर यांनी केली.

दरेकर म्हणाले, कोरोना संकटाच्या नावाखाली मराठा समाजातील लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न राज्यसरकारने करू नये. कोरोना निश्चित आहे काळजी सर्वांनी घेतली पाहिजे परंतु त्याचबरोबर मराठा समाज अस्वस्थ आहे. त्याच्या भावना ते व्यक्त करणार नाही का? कोरोनाचं कारण काढत मराठा समाजचा आवाज किंवा इतर समाजाचे आवाज दाबता येणार नाही. कोरणाचं भांडवल करत मराठा आरक्षणाला मूठमाती देऊ नका अशी विनंती दरेकर यांनी केली.


हेही वाचा – मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला भाजपचा पाठिंबा, सरकारच्या पोलखोलसाठी समितीची स्थापना


First Published on: May 16, 2021 8:50 PM
Exit mobile version