राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची मतं फुटण्याची शक्यता, शेलारांचे संकेत

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची मतं फुटण्याची शक्यता, शेलारांचे संकेत

भारताच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. एनडीएकडून द्रौपदी मूर्म आणि युपीएकडून यशवंत सिन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित आहे. आम्हाला रेकॉर्डब्रेक आमदारांचं समर्थन मिळेल, असा विश्वास भाजप आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे. तर महाविकास आघाडीतील अनेक आमदार पक्षमर्यादा झिडकारुन आज द्रौपदी मुर्मू यांच्या समर्थनात मतदान करतील, असे संकेत आशिष शेलार यांनी दिले आहेत.

महाविकास आघाडीची मतं फुटण्याची शक्यता

आशिष शेलारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडीतील अनेक आमदार पक्षमर्यादा झिडकारुन आज द्रौपदी मुर्मू यांच्या समर्थनात मतदान होईल. आम्हाला जी वाढीव मतं मिळतील ती इतिहास घडवणारी असतील. राज्यात आता महाविकास आघाडीचं अस्तित्व दिसत नाही. त्यांच्या समन्वयाचा तर विषयच नाही. जे रोज तोंडावर आपटले ते आता पुन्हा उभा राहण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यसभा, विधानपरिषदेतही विरोधक हेच बोलत होते. कायदा स्पष्ट आहे, संविधान स्पष्ट आहे. ज्यांना अभ्यास माहिती आहे त्यांना माहिती आहे. हा निर्णय शिंदे गटाच्या बाजुने लागेल, असं आशिष शेलार म्हणाले.

मुर्मूंचा विजय निश्चित?

राष्ट्रपतीपदासाठी मतदान करणाऱ्या जवळपास भाजपच्या ६४ आमदारांनी द्रौपदी मुर्मू यांना मतदान केलं आहे. त्यामुळे साहजिकच त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तर दोन अपक्षांनी सुद्धा मतदान केलं आहे. आज मतदान झाल्यानंतर २१ जुलै रोजी निकाल जाहीर होणार असून येत्या २५ जुलै रोजी नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे कोणता उमेदवार जिंकून येतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे.


हेही वाचा : आमचा पाठिंबा एका आदिवासी महिलेला, शिवसेना संभ्रमात नाही; संजय राऊतांचं स्पष्टीकरण


 

First Published on: July 18, 2022 10:43 AM
Exit mobile version