शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ रद्द करा, भाजप आमदार प्रशांत बंब यांची मागणी

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ रद्द करा, भाजप आमदार प्रशांत बंब यांची मागणी

मुंबई – पूर्वी तीन टक्केच सुशिक्षित लोक विधिमंडळात होते त्यामुळे विधान परिषदेसाठी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निर्माण झाले. आता आम्ही सगळेच सुशिक्षित आहोत. त्यामुळे राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ रद्द झाले पाहिजेत, अशी मागणी भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केली. त्यांच्या या मागणीमुळे राज्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या दिवशी राज्यातील शिक्षक बंब यांच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहेत.

राज्यातील शिक्षकांचे घरभाडे भत्ता बंद मागणी बंब यांनी विधानसभेत केली होती. या मागणीवरून शिक्षक आक्रमक झालेले असताना दुसरीकडे प्रशांत बंब यांनी शिक्षक मतदारसंघ रद्द करण्याच्या केलेल्या वक्तव्यामुळे शिक्षकांच्या संतापात भर पडली आहे. त्यांच्या विरोधात राज्यातील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी वैजापूरमध्ये शिक्षक संघटनांनी समन्वय समिती स्थापन करून मोर्चा काढला होता. यामध्ये सुमारे ६०० ते ७०० शिक्षक सहभागी झाले होते. यावेळी शिक्षकांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनही पाठवले होते.

शिक्षकांच्या नाराजीच्या संदर्भात आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना बंब म्हणाले की, मी जे बोललो त्याच्या विरोधात आंदोलन करणे म्हणजे माझे बोलणे खरे आहे आणि शिक्षकांना किती लागले हे दिसते. यातून माघार घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. कारण तुम्ही गावात राहण्याची कागदपत्रे सादर करता पण त्या गावात राहत नाहीत. म्हणजे शिक्षकांकडून खोटी कागदपत्रे दाखल होतात हा गुन्हा नाही का? अशा प्रकारे भाड्याची रक्कम घेत असतील तर त्यांचे म्हणणे काय आहे? असा सवालही त्यांनी केला.

“महाराष्ट्रातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ रद्द केले पाहिजेत. वीस वर्षांपूर्वीच हे बंद व्हायला हवे होते. त्याऐवजी दुसरे कोणते मतदारसंघ पाहिजेत याचा सर्वांनी मिळून विचार करावा. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील बहुतांश आमदार हे शिक्षकांना खोटा पाठिंबा देतात हे मी जबाबदारीने सांगतोय”
प्रशांत बंब – आमदार, भाजप


हेही वाचा : दर्शन बाप्पांचे, डावपेच राजकारणाचे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गणेश


 

First Published on: September 1, 2022 8:39 PM
Exit mobile version