घरताज्या घडामोडीदर्शन बाप्पांचे, डावपेच राजकारणाचे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गणेश यात्रा

दर्शन बाप्पांचे, डावपेच राजकारणाचे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गणेश यात्रा

Subscribe

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने एकमेकांच्या घरी जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन घेण्याचा सिलसिला राजकीय नेत्यांचा सुरु झाला आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी घेतली असून हे दोन्ही नेते गेल्या दोन दिवसांपासून गणेश दर्शन यात्रेवर आहेत.

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने एकमेकांच्या घरी जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन घेण्याचा सिलसिला राजकीय नेत्यांचा सुरु झाला आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी घेतली असून हे दोन्ही नेते गेल्या दोन दिवसांपासून गणेश दर्शन यात्रेवर आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या भेटीगाठींचे महत्व वाढले असून बाप्पांच्या दर्शनच्या निमित्ताने राजकीय डावपेच आखले जात आहेत. (Ganesh Yatra of Chief Minister Eknath Shinde)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. केवळ दर्शनासाठी आलो होतो.या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. केवळ सदिच्छा भेट असल्याचे शिंदे यांनी या भेटीनंतर स्पष्ट केले. आम्ही सगळ्यांनी बाळासाहेबांचा मार्गदर्शनाखाली काम केले आहे. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या काळातील आठवणी निघाल्या, असे शिंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा पराभव करण्याचा चंग भाजप आणि शिंदे गटाने बांधला आहे. शिवसेनेला नमविण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाला मनसेची प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत हवी आहे. त्यसाठी शिंदेंसह भाजप नेते आणि राज ठाकरे यांच्या भेटी वाढल्या आहेत. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी अलीकडेच ठाकरे यांच्या भेटी घेतल्या आहेत.

आज एकनाथ शिंदे यांनी भेट घेतल्याने भाजप, शिंदे गट आणि मनसे शिवसेनेच्या विरोधात उभे राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. राज्यसभा, विधान परिषद निवडणुका तसेच शिंदे- फडणवीस सरकार वरील विश्वास दर्शक प्रस्ताव अशा प्रत्येक वेळी राज ठाकरे यांनी भाजप तसेच शिंदे गट यांच्या बाजूने उभे राहणे पसंत केले आहे. त्यामुळे तिघांनी अद्याप एकत्र येण्याबाबत घोषित केले नसले तरी यामाध्यमातून शिवसेना तसेच शिवसैनिक यांच्यावरील मानसिक दबाव वाढविण्यात भाजपचा प्रयत्न आहे.

- Advertisement -

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आज माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, समन्वयक आशीष कुलकर्णी यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनीही शिंदे यांच्या ठाण्यातील घरी जाऊन बाप्पांचा आशीर्वाद घेतला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.


हेही वाचा – योगी सरकारच्या यूपीतील मदरशांच्या सर्वेक्षणाचे निर्णय म्हणजे ‘एनआरसीच’; ओवैसींचा गंभीर आरोप

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -