हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं पुराव्यासकट यादी देईल, उदयनराजेंचा भाजपला घरचा आहेर

हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं पुराव्यासकट यादी देईल, उदयनराजेंचा भाजपला घरचा आहेर

साताऱ्याचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले आहेत.

राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या घटक पक्षांच्या नेत्यांवर ईडी, सीबीआयची कारवाई सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर घोटाळ्यांचे आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांची चौकशी ईडीकडून करण्यात येत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या नेत्यांनी ईडीच्या कारवाईवरुन भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप राजकीय हेतूसाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर करण्यात येत असल्याचे आरोप होत आहेत. यावर भाजप नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे. हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं, सगळ्यांची यादी पुराव्यासकट देई मग ते कोणीही असो असे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी करुन भाजपला घरचा आहेर दिला आहे.

भाजप नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी ईडीच्या कारवाईवर संताप व्यक्त केला आहे. उदयनराजे प्रतापगडावर देवीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये संताप व्यक्त केला आहे. उदयनराजे यांनी म्हटलं आहे की, जसं आपण पेरतो तेच उगवते, आमच्या मागे ईडी नाही. ज्यांनी वाईट केलंय त्याच्या मागे का लागले आहेत. हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं मी त्यांना पुराव्यासह यादी ईडीला देईल असे उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांना ईडीच्या कारवाईवर भाजपवर टीका करण्यात येतोय. भाजप ईडीचा वापर करुन महाविकास आघाडीला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप केला जातोय असं विचारले यावर खासदार उदयनराजे यांनी कोणीही असू दे मी सर्वांची यादी देतो, सोयीप्रमाणे राजकारण करायचे आणि एकमेकांचे झाकायचे बस झालं आता राजकारण असा संताप उदयनराजे यांनी व्यक्त केला आहे.

उदयनराजेंचे शिवेंद्रराजेंना प्रत्युत्तर

मला चारचाकीने फिरायला परवडत नाही. मी चालत फिरेन नाहीतर रांगत फिरेन, लोळत फिरेन तुम्हाला दुःख वाटत असेल तर तुम्हीपण तसं करा असे रोखठोक प्रत्युत्तर उदयनराजे यांनी दिले आहे. उदयनराजेंनी दुचाकी चालवण्यापेक्षा सातारा नगरपालिका व्यवस्थित चालवली असती तर पोस्टरबाजी करण्याची वेळ आली नसती अशी टीका शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली होती.


हेही वाचा :  आनंदराव अडसूळांना हायकोर्टाचा दणका, ईडीच्या विरोधातील याचिका फेटाळली


 

First Published on: October 14, 2021 6:53 PM
Exit mobile version