Raj Thackeray: भाजप नेते मंगलप्रभात लोढा राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल, भेटीमागचं कारण गुलदस्त्यात?

Raj Thackeray: भाजप नेते मंगलप्रभात लोढा राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल, भेटीमागचं कारण गुलदस्त्यात?

राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे यांच्यातील जवळीक वाढताना दिसत असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. परंतु लोढा यांचं भेटीमागचं नक्की कारण काय आहे. हे अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या भेटीमुळे आता राजकीय खलबत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काही दिवसांपासून भाजपचे नेते राज ठाकरे यांना वारंवार भेट देताना पहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज मंगलप्रभात लोढा यांनी राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर त्यांची भेट घेतली आहे. शिवाजी पार्कवर सुरू असलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा या भेटीला मांडला जाणार आहे. शिवाजी पार्कमध्ये खडी टाकून एक ट्रॅक तयार केला जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या या बांधकामावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

महापालिकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना या दोन पक्षांमध्ये मुख्य लढत पहायला मिळणार आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणे शिवसेना आणि भाजपच्या जागांमध्ये अटीतटीची लढत होऊन जागांचा फरक असल्याच मनसे पक्ष महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. दुसरीकडे भाजप नेत्यांच्या भेटीमुळे युती छुप्या किंवा उघडपणे होऊ शकते, असं देखील सांगितलं जातंय. मात्र, या भेटीबाबत अद्यापही भाजप किंवा मनसेतील नेत्यांकडून कोणतही वक्तव्य करण्यात आलेलं नाहीये. परंतु सत्ता स्थापनेसाठी मनसेची मोठी मदत होऊ शकते, असा मतप्रवाह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये असल्याचे समजते.


हेही वाचा : Telangana CM in Mumbai : तेलंगणाचे मुख्यमंत्री आज मुंबई दौऱ्यावर ! उद्धव ठाकरे, शरद पवारांची घेणार भेट


 

First Published on: February 20, 2022 12:55 PM
Exit mobile version