परीक्षेचा निकाल आधीच आला, शिवसेनेला अजून अभ्यास करावा लागेल; लाड यांचा टोला

परीक्षेचा निकाल आधीच आला, शिवसेनेला अजून अभ्यास करावा लागेल; लाड यांचा टोला

राज्यात गेल्या दोन आठवड्यापासून सुरु असलेला राजकीय सत्ता संघर्ष अखेर संपला आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच नवं शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. अशा परिस्थितीत बहुमत स्थिती करण्यासाठी आजपासून दोन दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडीबाबतही निर्णय होणार आहे. त्यामुळे हे अधिवेशनही राजकीय आरोप प्रत्यारोपामुळे गाजण्याची शक्यता आहे. मात्र अधिवेशनापूर्वीच भाजप नेते आणि विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. परीक्षेचा निकाल आधीच आला, शिवसेनेला अजून अभ्यास करावा लागेल अशा शब्दात प्रसाद लाड यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रसाद लाड म्हणाले की, परीक्षेचा निकाल आधीच आला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. भाजपला अपेक्षापेक्षा जास्त मार्क मिळतील. उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची रणनिती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच सरकार आणि या शिंदे फडणवीस सरकारची आजची परीक्षा निश्चितपणे पास करणार आहोत. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला,

शिवसेनेला अजून अभ्यास करण्याची गरज आहे. सेनेच्या तत्वज्ञानी लोकांना अजून अभ्यास करावा लागणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशापर्यंत कुठल्याही प्रकारचा व्हिप जारी करण्याला परवानगी नाही. ११ जुलैपर्यंत जैसे थी परिस्थिती आहे. शिवसेना पक्ष हा विधीमंडळात एकनाथ शिंदे यांचा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेना नेतृत्वाचे अभ्यास करून चर्चा केली तर त्याचा अजून परिणाम चांगला होईल. असा टोला प्रसाद लाड यांनी शिवसेनेला लगावला आहे.


एकनाथ शिंदेंच्या हातीखाली फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हावे हा खरा राजकीय भूकंप; राऊतांचा खोचक टोला


First Published on: July 3, 2022 9:47 AM
Exit mobile version