लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का? – उदयनराजे भोसले

लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का? – उदयनराजे भोसले

छत्रपती उदयनराजे भोसले यांची मागणी

काही दिवसांपूर्वी ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ हे पुस्तकाचे प्रकाशन दिल्लीतील भाजपाच्या कार्यालयात करण्यात आलं होत. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आल्याचं समोर आलं. या पुस्तकामुळे वाद निर्माण झाला आहे. हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर बंदी घालण्याची मागणी सोशल मीडियावर केली जात होती. छत्रपती शिवाजी महाराज एकमेवाद्वितीय आहेत. त्यांच्याशी तुलना होणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही आणि येणारही नाही, अशी भावना सोशल मीडियावरून व्यक्त केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पुस्तकाबाबत संताप व्यक्त करत त्यांनी लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का? असा प्रश्न पडला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. जाणता राजा फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

‘अजून ते पुस्तक वाचनात आलेलं नाही. पुस्तकाबद्दल ऐकूण वाईट वाटलं. महाराजांवर प्रेम करणाऱ्याला प्रत्येकाला वाईट वाटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी करण्या इतकी जगात कोणाचीही उंची नाही आहे. तसंच जगातील आदर्श व्यक्ती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघितलं जातं’, असं यावेळी त्यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, ‘३५० वर्षांनंतरही शिवाजी महाराजांचं नावं काढलं तरी अंगावर शहारा आणि चैतन्य निर्माण होते. आपण त्यांचा विचार आचरणात आणण्याच प्रयत्न करू शकतो, अनुकरण करू शकतो. पण शिवाजी महाराज कोणी होऊ शकत नाही.’

तसंच त्यांनी यावेळी शिवसेनेवर टीका केली. ते म्हणाले की, ‘शिवसेना नावं दिलं तेव्हा वंशजांना विचार होत का असा सवाल यावेळी केला. याशिवाय महाशिवआघाडी असं नावं दिलं तेव्हाही विचारलं होतं का? सोयीप्रमाणे वापर करायचा आणि सोयीप्रमाणे विसर पडणे हीच यांची लायकी आहे.’


हेही वाचा – रामदेव बाबांनी दीपिकाला दिला सल्ला


 

First Published on: January 14, 2020 12:58 PM
Exit mobile version