BJP : फोटोबाजीशिवाय देशात दुसरे काय घडत आहे? ठाकरे गटाचा भाजपावर निशाणा

BJP : फोटोबाजीशिवाय देशात दुसरे काय घडत आहे? ठाकरे गटाचा भाजपावर निशाणा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून त्यांच्या देशभरातील मंत्र्यांना एखाद्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत फक्त फोटो प्रसिद्धीचा उत्सव साजरा करायचा आहे. कामाचे नाव नाही, फक्त प्रसिद्धीचाच सोस यांना जडला आहे. जाहिरातबाजी आणि फोटोबाजीशिवाय देशात दुसरे काय घडत आहे? असा निशाणा ठाकरे गटाने भाजपावर साधला आहे.

हेही वाचा – केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे… ठाकरे गटाची जोरदार टीका

अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर भारताने विश्वचषकाची लढाई हरली, पण भारत विश्वचषक जिंकला असता तर पंतप्रधान मोदी हातात विश्वचषक उंचावून कप्तान रोहित शर्मासह संपूर्ण स्टेडियमला उघड्या जीपमधून फेरफटका मारणार होते. गुजरातसह संपूर्ण देशभरात भारतीय जनता पक्ष विश्वचषक जिंकण्याचे श्रेय मोदी यांनाच देणार होता व त्या प्रसिद्धीची जोरदार तयारी आधीच झाली होती. राजस्थान वगैरे राज्यांत तर या विजयाचा वापर निवडणूक जिंकण्यासाठी होणार होता, पण आपण पराभूत झालो व उत्सवाचे सगळेच राजकीय मुसळ केरात गेले, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

हेही वाचा – केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे… ठाकरे गटाची जोरदार टीका

शहीद कॅ. शुभम यांच्या वीरमातेला मदत देण्याचा भाजपावाल्यांनी ‘इव्हेंट’ केला. तिकडे काश्मिरमध्येच शहीद झालेले दुसरे कॅप्टन एम. व्ही. प्रांजल यांचे पार्थिव शनिवारी बंगळुरू येथे अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘तेजस’ या लढाऊ विमानातून ‘विहार’ करीत होते, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

कॅ. शुभम गुप्तांच्या बाबतीत जे घडले तेच ‘पुलवामा’ व क्रिकेट विश्वचषकाच्या बाबतीत घडणार होते. हुतात्म्यांच्या चिता जळत असतानाही जे राजकीय नफा-तोट्याचा विचार करतात त्यांना बेशरम म्हणणे हासुद्धा आता राष्ट्रद्रोहासारखा गुन्हा ठरवला जाईल. कॅ. शुभम गुप्ता यांचे हौतात्म्य ही केंद्र सरकारची नामुष्की आहे आणि शुभम यांच्या घरी उत्तर प्रदेशच्या भाजपा सरकारमधील मंत्र्यांनी केलेला तमाशा हा बेशरमपणाचा कळस आहे, असा घणाघातही ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा – ठाकरे गटाच्या दहा शिलेदारांवर महाराष्ट्राची जबाबदारी; संघटनात्मक बांधणीला वेग

First Published on: November 27, 2023 12:00 PM
Exit mobile version