घरदेश-विदेशThackeray faction : केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे... ठाकरे गटाची जोरदार टीका

Thackeray faction : केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे… ठाकरे गटाची जोरदार टीका

Subscribe

मुंबई : आग्रा निवासी कॅप्टन शुभम गुप्ता यांस काश्मिरी खोऱ्यात अतिरेक्यांशी लढताना वीरमरण आले. कॅ. शुभम गुप्ता यांना प्राण का गमवावे लागले? केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे काश्मिरात असंख्य शुभम हौतात्म्य पत्करीत आहेत. पुलवामातील जवानांचे हत्याकांड हासुद्धा सरकारचा नाकर्तेपणाच होता. पुलवामात एकाच वेळी चाळीस ‘शुभम’ मारले गेले होते आणि आता रोज एक-दोन शुभम वीरगतीस प्राप्त होत आहेत, पण सरकार ना ‘पुलवामा’ रोखू शकले, ना शुभमसारख्या तरुण अधिकाऱ्यांचे प्राण वाचवू शकले. मोदी सरकार दंग आहे ते प्रचारात, अशी जोरदार टीका ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा – देशाला ‘पनौती’ लागली की…, ठाकरे गटाची मोदी सरकारवर घणाघाती टीका

- Advertisement -

शहीद शुभम गुप्ता यांची वीरमाता शोकमग्न असताना त्याचा विचार न करता 50 लाखांची मदत देण्याचा बेशरमपणा भाजपाच्या उत्तर प्रदेशचे मंत्री योगेंद्र उपाध्याय यांनी केला. पुलवामा हत्याकांडानंतरही भाजपाने असाच बेशरमपणा केला होता. पुलवामा शहिदांचे ‘फोटो’ आणि अस्थिकलश फिरवून मते मागण्याचा जाहीर कार्यक्रम तेव्हाही झाला. तेव्हा चाळीस जवान होते, आता चार आहेत इतकेच, पण भूमी तीच आहे, जेथे रोज आपले जवान शहीद होत आहेत, अशी टीकाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात केली आहे.

हेही वाचा – नौदल दिन: नौदल दिन दिवाळीसारखा साजरा करण्याचे नारायण राणेंचे सिंधुदुर्गवासीयांना आवाहन

- Advertisement -

महाराष्ट्रात ‘भाजपा’ म्हणजे भारतीय जुगार पार्टी झाली आहे, तर उत्तर प्रदेशात ‘बीजेपी’मधील ‘बी’ म्हणजे बेशरम आणि ‘पी’ म्हणजे पब्लिसिटी अर्थात स्वस्त प्रसिद्धी, असे समीकरण बनले आहे. आग्रा निवासी कॅप्टन शुभम गुप्ता यांस काश्मिरी खोऱ्यात अतिरेक्यांशी लढताना वीरमरण आले. काश्मिरात दोन कॅप्टनसह चार जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संपूर्ण भाजपा पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात दंग असल्याने त्यांना शोक व्यक्त करणे जमले नाही, पण देश मात्र हळहळला, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

हेही वाचा – अंतरवाली सराटी पोलीस दगडफेक: ऋषिकेश बेदरे अटकेच्या निषेधार्थ अजित पवार गटाकडून मोर्चा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -