मुलीला सिगरेटचे चटके, अघोरी अत्याचारापर्यंत पालक अज्ञानी कसे राहिले; चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

मुलीला सिगरेटचे चटके, अघोरी अत्याचारापर्यंत पालक अज्ञानी कसे राहिले; चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

मुंबई – अकोल्यातील 14 वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर भाजप महिला प्रदेशाध्यक्षांनी मुलीच्या पालकांना संपत्त सवाल केला आहे. ओळखीतीलच व्यक्ती आपल्या मुला-मुलींवर इतक्या अघोरी थराला जाऊन अत्याचार करेपर्यंत पालक कसे काय अज्ञान राहिले? असा संतप्त सवाल चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

अकोल्यात 14 वर्षांच्या मुलीचे मुंडन करून तिला सिगारेटचे चटके देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अत्यंत चीड आणणारी आणि संतापजनक ही घटना असून या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. अकोला पोलिसांनी ताबडतोब ॲक्शन मोडमध्ये येत तासाभराच्या आत नराधमाच्या मुसक्या आवळल्यात, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. आता पोलीस लवकरात लवकर कारवाई करतील आणि या हरामखोराला कठोरातील कठोर शिक्षा होईल, असे आश्वासनही भाजप महिला प्रदेशाध्यक्षांनी दिले आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या,”पण या निमित्ताने एक गोष्ट पुन्हा समोर आलीय ती ही की, या प्रकरणातील आरोपी हा कुटुंबातीलच नातेवाईक होता. ओळखीतीलच व्यक्ती आपल्या मुला-मुलींवर इतक्या अघोरी थराला जाऊन अत्याचार करेपर्यंत पालक कसे काय अज्ञान राहिले?” असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

वाघ म्हणाल्या, “आपल्या घरात येणाऱ्या व्यक्ती- नातेवाईक आपल्या मुलाबाळांशी कसे वागताहेत, याबाबतही पालक म्हणून आपण सतर्क राहायला हवं. मुलांना अशा व्यक्तींसोबत घरात एकटं सोडणं देखील धोकादायक आहे. अनेकदा मुलेही भीतीपोटी अशा घटना सांगण्यास धजावत नाहीत. त्यामुळेच पालक म्हणून मुलांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवत त्यांच्याशी संवाद साधणे अत्यंत गरजेचं आहे, तेव्हाच अशा अपप्रकारांबद्दल मुले मनमोकळेपणाने आणि धिटाईने आपल्याशी बोलू शकतील, असा सल्ला भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पालकांना दिला आहे.

बलात्काराच्या 97% प्रकरणात आरोपी परिचयातीलच

राष्ट्रीय क्राइम रिकॉर्ड ब्यूरोच्या 2022 च्या आकडेवारीनुसार 97 टक्के प्रकरणात आरोपी हा पीडितेच्या परिचयातीलच असल्याची माहिती समोर आली आहे. 2021 मध्ये 31 हजार 677 प्रकरणापैकी 30 हजार 571 प्रकरणात आरोपी हे पीडितेच्या परिचयातीलच होते. याच प्रकरणातील 15 हजार 196 प्रकरणातील आरोपी हे मित्र, शेजारी किंवा नातेवाईक आहेत. यातून हे सिद्ध होते की, महिलांना त्यांना अपरिचित व्यक्तींपेक्षा त्यांच्या परिचीत व्यक्तींपासूनच अधिक धोका आहे. नुकतेच एक प्रकरण मुंबईतील चेंबूरमध्ये समोर आले आहे. देशातील प्रतिष्ठित संस्था भाभा अणु संशोधन केंद्राच्या कॅम्पसमध्ये एका महाविद्यालयीन तरुणीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केला. या घटनांमुळे महाराष्ट्रातील महिला सुरक्षेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा : कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री सपशेल अपयशी, अकोल्याच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचे शरसंधान

First Published on: November 20, 2023 9:46 PM
Exit mobile version