पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार, तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर आरोप

पश्चिम बंगालमध्ये  भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार, तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर आरोप

पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार, तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर आरोप

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूका झाल्यापासून तिथले राजकारण चांगलेच पेटले आहे. पश्चिम बंगालच्या अनेक भागात हिंसाचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यामुळे विरोधी भाजपकडून ममता यांच्यावर सातत्याने टीका करणे सुरू आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये एका भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीवर ५ जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. हा बलात्कार तृणमूल काँग्रेसच्या कार्यक्त्यांनी केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.

भाजप कार्यकर्त्याच्या तक्रारीनुसार, तृणमूलच्या पाच कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील दोन जणांना अटक करण्यात आलीय. पीडित महिला ही मूकी आहे. तिला ६ वर्षांपूर्वी ब्रेन स्ट्रोक आल्याने तिची वाचा गेली गेल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी तिचा पती आणि मुलगा घरी नसताना तृणमूल काँग्रेसचे ब्लॉक प्रमुख कुतुबुद्दीन मलिक आणि टीएमसीचे युवा अध्यक्ष देवाशीष राणा यांच्यासह तीन जणांनी मिळून महिलेवर सामुहिक अत्याचार केले. दुसऱ्या दिवशी भाजप कार्यकर्ता मुलासह घरी आला तेव्हा त्याला ही घटना समजली. त्यानंतर त्याने तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

‘ही अत्यंत वाईट आणि खेदजनक घटना असून आम्ही भाजप कार्यकर्त्यांसोबत आहोत. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी’, असे तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे.

तृणमूल काँग्रेस बलात्कारासारख्या गुन्ह्यांचा शस्र म्हणून वापर करते

भाजपचे वरिष्ठ नेते अमित मालवीय यांनी तृणमूल काँग्रेसवर या प्रकरणी जोरदार टीका करत गंभीर आरोप देखील केले आहेत. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी नकार दिला होता. तृणमूलकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी तृणमूल काँग्रेस बलात्कारासारख्या गुन्ह्यांचा शस्र म्हणून वापर करत असल्याचा आरोप अमित मालवीय यांनी केला.

न्याय मिळत नाही तोवर लढा सुरू राहिल

या घटनेनंतर भाजपने तृणमूल काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांनी देखील ट्विट करत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. महिला मुख्यमंत्री असलेल्या काळात महिलांवर बलात्कार करुन त्यांचा राजकीय शस्र म्हणून वापर केला जाणे हे विचित्र आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी महिलेवर क्रूरपणे बलात्कार केला. पोलीस आणि प्रशासन या गुन्ह्यातील गुन्हेगारांना वाचवण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत असून पीडित महिलेला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरुचं राहिल असे त्यांनी म्हटले.


हेही वाचा – कपील सिब्बल यांच्या घरी विरोधकांची काँग्रेसच्या नेतृत्त्वावर चर्चा; चर्चेत शरद पवारही सहभागी

 

 

First Published on: August 10, 2021 4:28 PM
Exit mobile version