भाजपची नवी चाल, सदाभाऊंनी राज्यपालांना दिली १२ जणांची यादी

भाजपची नवी चाल, सदाभाऊंनी राज्यपालांना दिली १२ जणांची यादी

राज्यपाल नियुक्ती आमदारांच्या निवडीचे घोंघडे अद्याप भिजलेले असताना राज्यपाल नियुक्त सदस्यत्वासाठी रयत क्रांतीचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना १२ नावे सुचवली आहेत. राज्यपालांची भेट घेत १२ नावे सुचवली आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीतील तीन पक्षांनी १२ सदस्यांची नावे राज्यपालांकडे दिली आहेत. त्यामुळे यामध्ये खो घालण्यासाठी सदाभाऊ खोत यांनी सुचवेली नावे ही भाजपची नवी चाल असल्याचे बोलले जात आहे.

विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांनी ६ नोव्हेंबरला बारा जणांच्या नावांची यादी राज्यपालांकडे दिली आहे. त्यासाठी घालून देण्यात आलेली पंधरा दिवसांची मुदत संपली तरीही राजभवनाकडून अद्याप कोणाताही निर्णय झालेला नाही. अशातच माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्यपालांकडे बारा जणांची यादी पाठविली आहे. ज्यांना कधीही संधी मिळालेली नाही, अशा लोकांची यादी पाठवत असून त्यांच्या नावांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी विनंती खोत यांनी राज्यपालांना केली आहे.

सदाभाऊ खोत यांनी खालील १२ नावांची शिफारस केली आहे.

मकरंद अनासपुरे
विठ्ठल वाघ
विश्वास पाटील
झहीर खान
मंगलाताई बनसोडे
अमर हबीब
निवृत्ती महाराज इंदोरीकर
पोपरटार पवार
तात्याराव लहाने
प्रकाश आमटे
सत्यपाल महाराज
बुधाजीराव मुळीक

 

First Published on: November 25, 2020 2:29 PM
Exit mobile version