नागपूर: बेला येथील साखर कारखान्यात स्फोट; ५ कामगारांचा मृत्यू

नागपूर: बेला येथील साखर कारखान्यात स्फोट; ५ कामगारांचा मृत्यू

शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नागपूर जवळच्या बेला येथील मानस अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्यात बायोगॅसच्या टाकीत स्फोट झाला. या घटनेत पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटाने कारखान्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश प्रभाकर नौकरकर वय २१ , लीलाधर वामनराव शेंडे वय ४७, वासुदेव विठ्ठल लडी वय ३०, सचिन प्रकाश वाघमारे वय २४ व प्रफुल्ल पांडुरंग मुन वय २५ असे या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेतील सर्व मृत हे वडगाव येथील रहिवाशी असल्याने गावात दुखाःचा डोंगर कोसळला आहे.

पाचही जण मानस अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्यात काम करत असताना अचानक स्फोट झाला. यामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून पाचही जणांना मृत घोषित करण्यात आले असल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक राकेश ओला, उपअधीक्षक संजय पुरंदरे, स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बेला येथे धाव घेतली. या स्फोटाची घटना नेमकी कशामुळे झाली याचा तपास पोलीस करत आहेत.


दिलासादायक! देशात रिकव्हरी रेट वाढला; ११ लाख रुग्ण कोरोनामुक्त

First Published on: August 1, 2020 6:25 PM
Exit mobile version