आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये

आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये

येत्या काळात मुंबई महापालिका निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी तयारीला सुरूवात केली आहे. प्रत्येक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कंबर कसली आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे सुद्धा अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. राज ठाकरे पुढील काळात मुंबईतील मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेणार आहेत. तसेच, या बैठका मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मनसेचा प्लॅन काय असेल आणि तो यशस्वी होईल का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Bmc Election 2022 Mns Cheif Raj Thackeray Will Take Meetings with mns workers)

राज ठाकरे आज दुपारी ईशान्य मुंबईतील मनसेच्या पादाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. पायावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे राज ठाकरे यांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागली होती. मात्र, आता पुन्हा एकदा राज ठाकरे हे सक्रिय होणार आहेत. दरम्यान, राज ठाकरे विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेणार आहेत, त्यामध्ये संबंधित क्षेत्रांमधील नगरसेवकपदाचे इच्छूक उमेदवारही सहभागी होणार असल्याचे समजते.

दरम्यान, मागील आठवड्यात राज्याचे नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘शिवतीर्थ’वर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली होती. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांमध्ये राज ठाकरे हे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्यादृष्टीने फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात काही चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.

राज्यातील आमदारांपाठोपाठ शिवसेनच्या खासदारांनीही बंडाचे निशाण फडकावल्यामुळे उद्धव ठाकरे मोठ्या अडचणीत सापडले असतानाचा आता आणखी एक आव्हान त्यांच्यासमोर आ वासून उभे राहणार आहे.


हेही वाचा – खेड – भीमाशंकरसह महाराष्ट्रातील २ मार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा, केंद्रीय परिवहनमंत्र्यांची घोषणा

First Published on: July 19, 2022 9:56 AM
Exit mobile version