सलमान पाठोपाठ आता बिग बींना ‘X’ दर्जाची सुरक्षा

सलमान पाठोपाठ आता बिग बींना ‘X’ दर्जाची सुरक्षा

मुंबई पोलीस आणि राज्य सरकार गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या सर्व बड्या स्टार्सच्या सुरक्षेत वाढ करत आहे. अशात मंगळवारी (1 नोव्हेंबर) बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला वाय श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. यानंतर आज बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. बिग बींना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. (Bollywood amitabh bachchan security increased got x category security)

यामुळे अमिताभ बच्चन यांना मुंबई पोलिसांकडून एक्स दर्जाची सुरक्षा दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी अमिताभ बच्चन यांना मुंबई पोलिसांची केवळ सामान्य दर्जाची सुरक्षा दिली जात होती. यानंतर आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

आदल्या दिवशी बॉलीवूडचा भाईजान सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीशी संबंधित अनेक माहिती दिल्ली पोलिसांकडून मिळत होती, पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या काही आरोपींनीही सलमान खानला जीवे मारण्यासंदर्भात खुलासे केले होते. ज्यानंतर राज्य सरकारने सलमान खानची सुरक्षा Y+ श्रेणीतील सुरक्षा देण्यात आली आहे. त्याचवेळी सलमान खानला बंदुकीचा परवानाही देण्यात आला आहे.

कोणत्याही व्यक्तीला सुरक्षा द्यायची की नाही याबाबत राज्य गुप्तचर विभागाकडून रिपोर्ट तयार केला जातो. ज्यामधून तपासले जाते की, त्या व्यक्तीच्या जीवाला किती धोका आहे. या रिपोर्टच्या आधारे संबंधित व्यक्तीला सुरक्षा दिली जाते. महाराष्ट्र सरकारने अमिताभ बच्चन याच्यासह बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याला X दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे. यानुसार आता अक्षय कुमारला 3 पोलिसांकडून वेगवेगळ्या शिफ्टमध्ये सुरक्षा दिली जाते.


हेही वाचा : अयोध्येतील १४ कोस परिक्रमात धावपळ, श्वास नीट घेता न आल्याने भाविक बेशुद्ध

First Published on: November 2, 2022 2:56 PM
Exit mobile version