शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लग्नास नकार देणे ही फसवणूक नव्हे, मुंबई उच्च न्यायालयाकडून तरुणाची निर्दोष सुटका

शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लग्नास नकार देणे ही फसवणूक नव्हे, मुंबई उच्च न्यायालयाकडून तरुणाची निर्दोष सुटका

शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लग्नास नकार देणे ही फसवणूक नाही. असं मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं आहे. त्यामु्ळे या प्रकरणी मुंबई न्यायालयाकडून तरूणाची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी प्रेमी युगुलांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध होते. त्यानंतर तरूणाने लग्नास नकार दिल्यामुळे त्याने फसणूक केल्याचा आरोप तरूणीने केला आहे. पालघरमध्ये राहणाऱ्या तरूणावर पोलिसांनी बलात्कार आणि फसवणूक या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. १९ फेब्रुवारी १९९९ मध्ये न्यायालयाने आरोपी काशीनाथला बलात्कार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं.

पालघरमध्ये राहणाऱ्या काशीनाथ घरातने तरूणीला लग्नाचं वचन दिल्यानंतर तीन वर्ष तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. परंतु त्याने शारीरिक संबंधानंतर तरूणीसोबत लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे त्याला एक वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या प्रकरणी सुनावणी करताना आता न्यायाधीश अनुजा प्रभुदेसाई यांनी फसवणुकी प्रकरणी एका तरूणाची निर्दोष मुक्तता केली आहे.

तरूणी आणि आरोपी यांच्यामध्ये तीन वर्षांपर्यंत शारीरिक संबंध होते. परंतु कोर्टाने सांगितलं की, तरूणीने केलेल्या वक्तव्यामुळे तरूणाने फसवणुक केल्याचं सिद्ध होत नाही. तसेच आरोपी तरूणीसोबत लग्न करणार होता की नाही. याबाबत सुद्धा काहीही सबळ पुरावे तरूणीकडे नाहीयेत. त्यामुळे शारीरिक संबंधानंतर लग्न करण्यास नकार दिल्याबद्दल आणि फसवणूक केल्याबद्दल आरोपीला दोषी ठरवता येणार नाही. असं न्यायालयाने म्हटलं आहे.


हेही वाचा : ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट, बहुसंख्य कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर


 

First Published on: December 21, 2021 2:21 PM
Exit mobile version