घरताज्या घडामोडीST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट, बहुसंख्य कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर...

ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट, बहुसंख्य कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम

Subscribe

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला ४५ दिवस पूर्ण झाले आहेत. तरीदेखील राज्यातील काही भागांत एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन हे सुरूच आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि संपकरी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांच्यात एक महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबत महत्त्वाची घोषणा केली. मात्र, विलीनीकरणाची मागणी न्यायायलयात सुरूच राहील, परंतु एसटी कर्मचाऱ्यांचे अधिक नुकसान होऊ नये, यासाठी संप मागे घेत असल्याचे गुजर यांनी स्पष्ट केले. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्यास सांगणार असल्याचं अजय गुजर यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडल्याचं चित्र दिसत आहे.

एकीकडे कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली आहे. संपकरी भावनाविवश झाले आहेत. त्यांना आम्ही समजावून सांगू, विलिनीकरण न्यायप्रविष्ट असल्याने लढत राहणार आणि न्यायालयीन कामकाजासाठी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्या माध्यातून न्यायालयीन लढा सुरू आहे. असं अजय गुजर यांनी म्हटलं होते. परंतु अॅड. गुणरत्ने सदावर्ते हे आंदोलनावर ठाम आहेत. विलिनीकरणाची मागणी मान्य झाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका गुणरत्न सदावर्तेंनी घेतली आहे.

- Advertisement -

एसटी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर न्यायालयाच्या समितीचा निर्णय संपकरी आणि राज्य सरकार असा दोघांनाही मान्य आहे. शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये वेतन मिळण्याबाबत राज्य सरकारशी चर्चा करणार आहोत. ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ते कर्मचारी जर कामावर पुन्हा रूजू झाले. तर त्यांच्यावरची कारवाई मागे घेतली जाईल. असं राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले आहेत.

कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेने संप माघार घेतल्याच्या निर्णयानंतर आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिली आहे. विलिनीकरणाची मागणी मान्य झाल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नसल्याचं आंदोलकांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचारी संपामध्ये फूट पडल्याचं दिसून येत आहे.

- Advertisement -

दरम्यान, यापूर्वी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांना आझाद मैदानातून आम्ही आझाद केलं आहे. तसेच आता आपण गुजर यांना आझाद मैदानातून आझाद करत आहोत. अशी भूमिका आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांचे वकिल अँड. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्तवाखाली संप सुरूच ठेवू. आम्ही विलीनीकरणाच्या मागणासीठी त्यांना ठामपणे पाठिंबा देत आहोत. असे एसटी कर्मचारी म्हणाले.


हेही वाचा : TET Exam Scam Case : टीईटी पेपर फुटी प्रकरणी दोघांना अटक, आरोपींकडून खोटी प्रमाणपत्र जारी – पुणे पोलीस आयुक्त


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -