नाशिकमध्ये पाणी टंचाईने घेतला चिमुरड्याचा बळी

नाशिकमध्ये पाणी टंचाईने घेतला चिमुरड्याचा बळी

राज्यभरात भीषण दुष्काळ पडला आहे. या दुष्काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र होरपळून निघाला असताना या भीषण पाणी टंचाईने एका चिमुरड्याचा बळी घेतला आहे. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील विरगाव येथे ही घटना घडली आहे. हा चिमुरडा आपल्या वडिलांसोबत पाणी आणण्यासाठी गेला होतो. दरम्यान, त्याचा तोल गेल्याने तो रस्त्यावर कोसळा. यामध्ये अक्षय नंदू गांगुर्डे (११) या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमके काय घडले?

नाशिक जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. शेतीसाठी पाणी वाहतूक करत असताना टँकरखाली येऊन अक्षय याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विरगाव येथील अक्षय गांगुर्डे आज सकाळी आपल्या वडिलांसोबत पाण्याचा टँकर भरण्यासाठी गेला होता. पाण्याने भरलेला टँकर परत येत असताना अक्षयचा तोल गेल्याने तो रस्त्यावर कोसळला आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

First Published on: June 6, 2019 12:28 PM
Exit mobile version