पुण्यात प्रियकराचा प्रेयसीच्या हॉस्टेलमध्ये गोळीबार

पुण्यात प्रियकराचा प्रेयसीच्या हॉस्टेलमध्ये गोळीबार

आणेवाडी टोलनाक्यावर गोळीबार

एकमेकांसाठी प्रेमाच्या आणाभाका घेणारे प्रेमी युगल प्रेमभंग झाल्यावर प्रिय व्यक्तीच्याच जीवावर उठल्याची अनेक उदाहरण आपण यापूर्वी पाहिले आहेत. अशाच एका वेड्या प्रेमवीराने ब्रेकअपनंतर प्रेयसीला त्रास दिल्याची घटना समोर आली आहे. प्रेमभंगानंतर जीव देण्या-घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराने पुण्यात २३ वर्षीय प्रेयसीच्या वसतिगृहात जाऊन हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी समोर आली आहे. पुण्यातील बाणेर परिसरात असलेल्या एका वसतिगृहात हा प्रकार घडला. वसतिगृहातील तरुणीचे संबंधित तरुणासोबत प्रेमप्रकरण असल्याची माहिती आहे. मात्र दोघांचं नातं टिकू न शकल्यामुळे तरुणाचा प्रेमभंग झाला.

वाचा – लग्नात वधूवर गोळीबार; तरिही लग्न पुर्ण केलंच

तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

प्रेमभंगानंतर बिथरलेला तरुण सैरभैर अवस्थेतच प्रेयसी राहत असलेल्या वसतिगृहात गेला. तिथे जाऊन त्याने तिच्यासमोर तीन वेळा हवेत गोळीबार केला. एवढं करुन तो थांबला नाही, तर त्याने तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. उडी मारण्याच्या नादात तरुणाला चांगलाच मार लागला असून त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची दखल चतुश्रुंगी पोलिसांनी घेतली असून अधिक तपास सुरु आहे.

वाचा – भाजप नगरसेविकेच्या पतीवर गोळीबार

First Published on: February 5, 2019 2:09 PM
Exit mobile version