घरमहाराष्ट्रभाजप नगरसेविकेच्या पतीवर गोळीबार

भाजप नगरसेविकेच्या पतीवर गोळीबार

Subscribe

गोळीबारात पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्या छातीवर उजव्या बाजूने गोळी लागली आहे. त्यांना उपचारासाठी जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जळगाव महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका उषा पाटील यांचे पती आणि मनसेचे माजी नगरसेवक संतोषअप्पा मोतीलाल पाटील यांच्यावर सोमवारी सकाळी गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. जळगावच्या आर्यन पार्क भागात त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबारात पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्या छातीवर उजव्या बाजूने गोळी लागली आहे. त्यांना उपचारासाठी जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

छातीला लागली गोळी 

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संतोष पाटील यांचे आर्यन पार्क भागात शेत आहे. तिथे जाण्यासाठी सोमवारी सकाळी ते घरून निघाले. ते आर्यन पार्क भागात पोहोचले असता. त्याच्यावर मागून आलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने संतोष पाटील यांची दुचाकी अडवून त्यांच्यावर गोळी छाडली. पाटील यांच्या छातीवर उजव्या बाजूला गोळी लागली आहे. पाटील यांनी जखमी अवस्थेतचं आपल्या मुलाला मोबाईलवर फोनकरुन गोळीबार झाल्याचे कळवले. त्यानंतर जखमी झालेल्या पाटील यांना पुढील उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- Advertisement -

हल्लेखोराचा शोध सुरु 

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी दुचाकी, पिस्तुलच्या तीन बुलेट्स आढळून आल्या आहेत. यापैकी एक भरलेली, तर दोन रिकाम्या आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार हल्लेखोर पोद्दार शाळेच्या दिशेने पळून गेला. त्याने तोंडावर रुमाल बांधला होता आणि अंगात जॅकेट घातले होते. या हल्ल्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. जळगाव पोलीस याचा तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -