Coronavirus: ‘त्या’ भारतीयांना मायदेशात आणा, पवारांचे परराष्ट्रमंत्र्याने आवाहन

Coronavirus: ‘त्या’ भारतीयांना मायदेशात आणा, पवारांचे परराष्ट्रमंत्र्याने आवाहन

Coronavirus: 'त्या' भारतीयांना मायदेशात आणा, पवारांचे परराष्ट्रमंत्र्याने आवाहन

जगभरात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय वाहतुकीवर परिणाम झाला आहे. करोनाच्या धास्तीमुळे अनेक विमानांची उड्डाने रद्द करण्यात आली आहेत. याचा फटका परदेशात अडकलेल्या नागरिकांना बसला आहे. उझबेकिस्तानमध्ये ३९ भारतीय नागरिक अडकले आहेत. यामध्ये डॉक्टरांचा समावेश आहे. या सर्वांचा परतीचा मार्ग बंद झाला आहे. त्यांना परत आणण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना पत्र लिहिले आहे.


हेही वाचा – मध्य रेल्वेने केल्या ‘या’ गाड्या रद्द

उझबेकिस्तानमध्ये ३९ भारतीय नागरिक हे महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सांगली, नाशिक आणि पुण्यातील रहिवाशी आहेत. यामध्ये बहूतांश डॉक्टर आहेत. १० मार्च रोजी त्यांच्या नियोजित पर्यटन दौऱ्यासाठी उझबेकिस्तानमध्ये गेले होते. हे सर्वजण १७ मार्च रोजी भारतात येणार होते. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर विमान सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांचा परतीचा मार्ग खंडीत झाला आहे. त्यांना मायदेशात आणावे यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना पत्र लिहिले आहे.

 

First Published on: March 17, 2020 6:43 PM
Exit mobile version