रक्षाबंधनाच्या दिवशीच चिमुकल्या बहीण-भावाला काळाने हिरावले

रक्षाबंधनाच्या दिवशीच चिमुकल्या बहीण-भावाला काळाने हिरावले

बहिण-भावांच्या नात्यावर आधारित असलेला सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण शुक्रवारी सर्वत्र ठिकाणी साजरा करण्यात आला. पण याच दिवशी लातूर जिल्ह्यातील निटूर येथे एक दुर्दैवी घडना घडल्याचे समोर आले आहे. बहीण-भावाच्या नात्याला समृद्ध करणाऱ्या या रक्षाबंधनच्या दिवशी चिमुकल्या बहीण-भावाला काळाने हिरावून नेले. हे चिमुकले भावंड नाल्याजवळ खेळत असताना त्याचा नाल्यात तोल जाऊन ते दोघेही नदीत पडले. नाल्यात पडल्याने त्या दोघांचा मृत्यू झाला.

अशी घडली घटना

निटूर येथे असणाऱ्या ग्रामपंचाय़तीच्या बाजूलाच साधारण दहा फूट खोल असा नाला तयार करण्यात आला आहे. या नाल्यात मुसळधार पावसाने बरेच पाणी साचले होते. गुरूवारी दुपारी निटूर येथे असणाऱ्या सदानंद मठाजवळ जोया आणि आदिल फकीर असे नाव असणारे दोघे भावंडे खेळत होते. या भावंडांमध्ये जोया ही सात वर्षाची असून तिचा भाऊ वयवर्ष पाच असणारा आदिल या नाल्याजवळ खेळत होते. खेळताना दोघांचा तोल गेल्याने नाल्यात पडून त्यांचा मृत्यू झाला.

या घडलेल्या घटनेनंतर नातेवाईकांनी दुःख व्यक्त करत या दोघांचे मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयात आणून ठेवले. या भावंडांच्या मृत्यूला सर्वस्वी ग्रामपंचायत जबाबदार असून त्याच्या हलगर्जीपणामुळेच दोघांचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईंकांनी केला आहे.

याप्रकारामुळे निटूर गावावर शोककळा पसरली आहे. यावेळी सरपंचाविरूद्ध गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा ठाम निर्णय नातेवाईकांनी घेतला आहे.

First Published on: August 16, 2019 2:15 PM
Exit mobile version