श्रीपाद छिंदमच्या भावाने केली मतदान यंत्राची पूजा

श्रीपाद छिंदमच्या भावाने केली मतदान यंत्राची पूजा

श्रीपाद छिंदमच्या भावाने केली मतदान यंत्राची पूजा

निवडणुकीच्या काळात सत्ता मिळावी यासाठी राजकारणी काय शक्कल लढवतील हे सांगता येणार नाही. आज अहमदनगरच्या माहापालिका निवडणूकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. हे मतदान सुरु होण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदम याच्या भावाने मतदान यंत्राची पूजा केली आहे. त्याने एका ब्राह्मणाला घेऊन ही पूजा केली आहे. यावर्षी अहमदनगरच्या महापालिका निवडणूकीसाठी छिंदम आणि त्याची पत्नी अपक्ष म्हणून उभे राहिले होते. या छिंदमाला तडिपार करण्यात आले होते. तसेच उपमहापौर पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

कोण आहे छिंदम?

अहमदनगर महानगरपालिकेत छिंदम हा भाजप पक्षाकडून उपमहापौर या पदावर होता. मात्र एका कंत्राटदाराशी फोनवर संभाषण करत असताना त्याने शिवाजी महाराजांबद्दल अश्लिल आणि घृणास्पद शब्द वापरले होते. त्यामुळे संबंध महाराष्ट्रात छिंदम विरोधात संताप व्यक्त करण्यात आला होता. तसेच भाजपच्या विरोधातही लोकांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे भाजपने छिंदमला उपमहापौर पदावरून बाजुला केले होते. त्याचबोरबर त्याला न्यायालाने त्याला तडिपार केले होते. आगामी महापालिकेच्या निवडणूकीत छिंदम पुन्हा अपक्ष म्हणून उभा राहिला आहे. यावेळी तो वार्ड क्रमांक ९ तर त्याची पत्नी वार्ड क्रमांक १३ मधून निवडणूक लढवित आहेत.


हेही वाचा – छत्रपतींचा अवमान करणारा श्रीपाद छिंदम तडीपार

First Published on: December 9, 2018 11:47 AM
Exit mobile version