कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पांच्या नातीची आत्महत्या, राहत्या घरी घेतला गळफास

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पांच्या नातीची आत्महत्या, राहत्या घरी घेतला गळफास

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पांच्या नातीची आत्महत्या, राहत्या घरी घेतला गळफास

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या नातीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. शुक्रवारी येडियुरप्पा यांची नात सौंदर्याचा मृतदेह राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु सौंदर्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात नेण्यात आला आहे. येडियुरप्पा यांच्या नातीने आत्महत्या केली असल्याचे समजल्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई येडियुरप्पा यांचे सांत्वन करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. सौंदर्याचे लग्न २०१९ मध्ये डॉ. नीरज यांच्याशी झाले होते.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांची नात बंगळुरू येथे राहत होती. राहत्या घरीच नात सौदंर्या हिने गळफास घेऊन आत्महत्य केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सौंदर्याचा मृतदेह बंगळुरु येथील घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. नातीने आत्महत्या केली असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या कार्यालयाने दिली आहे. सौंदर्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात नेण्यात आला आहे.

माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची नात सौंदर्या नैराश्येत होती असेही सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमदर्शनी सौंदर्याने आत्महत्या केली असल्याचे दिसत आहे. सकाळी १० वाजताच्या सुमारास आत्महत्या केली आहे. मोलकरीन जेव्हा दरवाजा ठोठावत होती तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही कारण दरवाजा आतून बंद करण्यात आला होता. यानंतर मोलकरणीने सौंदर्याचा पती नीरजला फोन करुन माहिती दिली. डॉ. नीरज घरी पोहोचल्यावर दरवाजा खोलण्यात आला तेव्हा सौंदर्याचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.


हेही वाचा : Santosh Parab Attack Case: नितेश राणे यांच्या जामिनावर सोमवारी होणार फैसला

First Published on: January 28, 2022 3:54 PM
Exit mobile version