धक्कादायक: दफन केलेले मृतदेह भटक्या कुत्र्यांनी काढले बाहेर,लचके तोडलेले मृतदेह पाहून नागरिक हैराण

धक्कादायक: दफन केलेले मृतदेह भटक्या कुत्र्यांनी काढले बाहेर,लचके तोडलेले मृतदेह पाहून नागरिक हैराण

धक्कादायक: दफन केलेले मृतदेह भटक्या कुत्र्यांनी काढले बाहेर,लचके तोडलेले मृतदेह पाहून नागरिक हैराण

बुलढाण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुलढाण्याच्या स्मशानभूमीत दफन केलेले मृतदेह परिसरातील भटक्या कुत्र्यांनी बाहेर काढले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरमधील वैकुंठधाम स्मशानभूमीतील हा धक्कादायक प्रकार आहे. भटक्या कुत्र्यांनी स्मशानभूमीत प्रवेश करुन तिथे दफन करण्यात आलेल्या मृतदेह उकरुन काढले. उकरुन बाहेर काढलेले मृतदेह त्यांनी स्मशानभूमीच्या बाहेर काढून त्याचे लचके तोडले. हा सर्व प्रकार पाहून तेथील स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे. मृतदेहाचे झालेले हाल पाहून नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

बुलढाण्याच्या मलकापूर या ठिकाणी एका नदीच्या काठावर माता महाकाली वॉर्ड आहे. या परिसरात काही वर्षांपूर्वी वैकुंठधाम स्मशानभूमी तयार करण्यात आली. मात्र स्मशानभूमीच्या भिंती काही वर्षांपूर्वी पडल्या आहेत. तिथे कोणतेही काम करण्यात आलेली नाही. पडलेल्या भिंतीमुळे ही स्मशानभूमी उघडी आहे. त्यामुळे भटके कुत्रे स्मशानभूमीत सहज प्रवेश करु शकतात.या स्मशानभूमीवर सर्वधर्मियांचे अंत्यसंस्कार करण्यात येतात.

तिथल्या स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून हे भटके कुत्रे स्मशानभूमीत प्रवेश करतात. तिथे दफन करण्यात आलेले मृतदेह उकरुन काढतात. त्याचप्रमाणे अर्धवट जळालेले मृतदेहही बाहेर काढून ते फरफटत आणून त्याचे लचके तोडले जातात. बऱ्याच वेळा हे दृष्य नागरिकांना त्यांच्या उघड्या डोळ्यांनी पहावे लागते. त्याचप्रमाणे परिसरात अनेक ठिकाणी मृतदेहांचे सांगाडे आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे लचके तोडलेल्या मृतदेहांचे तुकडे हे भटके कुत्रे गावा गावात घेऊन जातात. मृतदेहांची अशाप्रकारची होणारी विटंबना पाहून गावातील नागरिक त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये भितीचे वातावरण पहायला मिळत आहे. सातत्याने मृतदेहांची होणारी ही विटंबना थांबवावी अशी मागणी तिथल्या नागरिकांनी केली आहे. त्याचप्रमाणे ही स्मशानभूमी दुसऱ्या ठिकाणी हलविण्याची मागणीही तिथल्या स्थानिक नागरिकांनी केली आहे.


हेही वाचा –  संतापजनक! कौमार्य चाचणीत नापास झाल्याने नववधूला दिला घटस्फोट
First Published on: April 12, 2021 8:45 PM
Exit mobile version