नीच पातळीवरच्या राजकारणामुळे महाराष्ट्रात येणारा गुंतवणुकीचा प्रवाह आटेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नीच पातळीवरच्या राजकारणामुळे महाराष्ट्रात येणारा गुंतवणुकीचा प्रवाह आटेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील अनेक प्रकल्प बाहेर गेल्याने सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला विरोधकांकडून चांगलेच धारेवर धरले जात आहे. अशातच सातत्याने होणाऱ्या या टीकेवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अत्यंत नीच पातळीवरच्या या राजकारणामुळे महाराष्ट्रात येणारा गुंतवणुकीचा प्रवाह आटेल. विरोधकांचे हे कारस्थान उघड करण्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे समजते. (Cabinet Meeting Cm Eknath Shinde Statement Industries Project Political Controversy)

बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात असल्याचा अपप्रचार करून राज्याची बदनामी केली जात आहे. हे खालच्या पातळीवरचे राजकारण थांबविण्यासाठी प्रत्येक मंत्र्याने आणि अधिकाऱ्याने सक्रिय होणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचे समजते. तसेच, हा महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा भाग आहे. बदनामी थांबविण्यासाठी अधिकाऱ्यांनी जबाबदारी उचलावी असेही त्यांनी सांगितल्याचे समजते.

राज्यातील विविध प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याने शिंदे-फडणवीस सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची बदनामी रोखण्यासाठी मी पत्रपरिषद घेतली. अशाच पद्धतीने मंत्र्यांनीही खरी माहिती जनतेसमोर ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. देवेंद्र फडणवीसांच्या या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दुजोरा दिला. त्यामुळे येत्या काळाता शिंदे-फडणवीस सरकारकडून विरोधकांना कसे प्रत्युत्तर दिले जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – ‘वेडात मराठे वीर दौडले ४०’ चे प्रोड्युसर, दिग्दर्शक एकनाथ शिंदे, राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांनाच दिला क्लॅप

First Published on: November 3, 2022 7:44 AM
Exit mobile version