उद्या सायंकाळी ७ ते १० टीव्ही बंद राहणार

उद्या सायंकाळी ७ ते १० टीव्ही बंद राहणार

चॅनल पसंतीसाठी आता ग्राहकांच्या हाती केवळ एकच दिवस

संध्याकाळी ७ ते १० वाजेची वेळ ही घराघरात टीव्ही मालिका पाहण्याची वेळ बनली आहे. या वेळेत घराघरातील प्रेक्षक विशेष करुन लाखो गृहिणी आपल्याला हवी ती मालिका पाहत असतात. काही प्रेक्षक या वेळात बातम्यांच्या वाहिन्या पाहत असतात, तर काही प्रेक्षक चित्रपट पहात असतात. दिवसभराचे काम आणि प्रवास या दगदगीतून विरंगूळा मिळावा म्हणून दिवसाच्या सरतेशेवटी लोक सायंकाळी टीव्ही पाहणं पसंत करतात. परंतु, प्रेक्षकांना आता पुढचे दोन दिवस सायंकाळी टीव्ही पाहता येणार नाही. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकारणच्या (ट्राय) नव्या जाचक अटींविरोधात केबल व्यावसायिकांनी पुढील दोन दिवसांमध्ये सायंकाळी सर्व वाहिन्या प्रक्षेपित न करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ‘ट्राय’ने ग्राहकांना चॅनल्स निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. परंतु, या नव्या नियमांबरोबर आणखी जाचक अटी ‘ट्राय’ने लावले आहेत, असा आरोप केबल व्यावसायिकांनी केला आहे.

हेही वाचा – केबल ऑपरेटर्सचा व्यवसाय बंद करण्याचा सरकारचा डाव

केबल व्यावसायिकांचा स्टार कंपनीवर मोर्चा

ट्रायने ग्राहकांना चॅनेल निवडीची मुभा दिली आहे. त्याचबरोबर प्रत्येक चॅनलची किंमत देखील ‘ट्राय’ने ठरवून दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील केबल चालक आणि मालकांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे आमदार अनिल परब देखील उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत परब यांनी केबल व्यावसायिकांना ज्या अटींचा त्रास होतेय, त्या अटिंविषयी माहिती दिली. याच पार्श्वभूमीवर २८ डिसेंबरला केबल व्यावसायिक स्टार कंपनीवर मोर्चा काढणार आहेत. त्याचबरोबर ‘ट्राय’च्या जाचक करांविरोधात केबल व्यावसायिक पुढील दोन दिवसांमध्ये संध्याकाळी ७ ते १० वेळेत सर्व टीव्ही चॅनल्स बंद ठेवणार आहेत.

First Published on: December 26, 2018 2:13 PM
Exit mobile version