Mumbai Theft : तरूणींसोबत मजा-मस्ती करण्यासाठी आठ लाखांचा गंडा, पोलिसांकडून कार ड्रायव्हरला अटक

Mumbai Theft : तरूणींसोबत मजा-मस्ती करण्यासाठी आठ लाखांचा गंडा, पोलिसांकडून कार ड्रायव्हरला अटक

तरूणींसोबत मजा मस्ती करता यावी, यासाठी चोरी करणाऱ्या तरूणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुंबईतल्या कांदीवली येथील पोलिसांनी एका २८ वर्षीय कार ड्रायव्हरला अटक केली आहे. व्यावसायिक तब्बल आठ लाखांची रोख रक्कम घेऊन बाहेर निघाला होता. रोकड कारमध्येच ठेवून तो घरात कामानिमित्त गेल्यानंतर हीच संधी साधत चोरट्याने पैशांवर डल्ला मारला. चोरीच्या पैशातून हॉटेल खरेदी करत रोज नवनवीन मुलींसोबत मजा-मस्ती करण्याचा त्याचा बेत होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

१८ जानेवारीला कांदिवलीच्या हिरानंदनी सोसायटीत राहणाऱ्या एका व्यावसायिकाने अमित राजेश सिंग नावाच्या ड्रायव्हरला कामावर ठेवले होते. मात्र, व्यावसायिक आठ लाखांची रोख रक्कम घेऊन बाहेर निघाला होता. परंतु टिफिन घरीच विसरल्यामुळे तो आणण्यासाठी व्यावसायिक गाडीतून उतरला. त्यानंतर टिफीन आणण्यासाठी तो घरी गेला असता कार ड्रायव्हरने याच संधीचा डाव साधला. त्याने कार सोसायटीच्या बाहेर नेली. नंतर मंदिराजवळ कार पार्क करुन त्यात ठेवलेले ८ लाख रुपये चोरले आणि ते घेऊन त्याने पळ काढला.

दरम्यान, या प्रकरणानंतर व्यावसायिकाने कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरु केला. तेव्हा आरोपी चोरी करुन सुरतला गेल्याचे आढळून आले. मात्र, सुरतहून हा आरोपी अयोध्येहून कोटा आणि त्यानंतर चंदिगढला गेल्याचंही समोर आलंय. परंतु पोलिसांनी या आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमित राजेश सिंग असून त्याचे वय २८ वर्षे आहे. तसेच तो कांदिवली परिसरात राहतो. याआधी सुद्धा त्याने अनेक वेळा चोऱ्या केल्याची माहिती मिळाली आहे.


हेही वाचा : बाळासाहेब ठाकरेंच्या मराठी भाषेतील टोले आम्ही अनुभवले : अजित पवार


 

First Published on: April 2, 2022 1:36 PM
Exit mobile version