नागपूर : कार उलटून अपघात; १ ठार, ७ जखमी

नागपूर : कार उलटून अपघात; १ ठार, ७ जखमी

नागपूर येथील वर्धा मार्गावरील गौसी मानापूर भागात कार उलटून भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये १ जण ठार झाला असून ७ जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हे सर्व मित्र ढाब्यावर जेवायला गेले होते. जेवण करुन पुन्हा घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात गोपालनगर येथे राहणाऱ्या यश रहाटे (२२) याचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश रहाटे आणि त्याचे सर्व मित्र सायंकाळी वर्धा मार्गावरील मिसीसीपी फुड्स ढाब्यावर जेवायला गेले होते. जेवण करुन सर्वजण नागपूरकडे येत होते. यावेळी यशचा मित्र हर्षल ठवरे हा गाडी चालवत होता. दरम्यान, गौसी मानापूर भागातील वळणावर हर्षल याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार उलटी झाली. या अपघातात सर्वजण जखमी झाले. या घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ दखल घेत घटनास्थळी धाव घेत जखमींना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून यश याला मृत घोषित केले. तर इतर दोघांची प्रकृत्ती चिंताजनक असून याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी हर्षल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जखमींची नावे

कार्तिक राजेंद्र सोमन (वय २४)
अविनाश अय्यर (वय २४)
आनंद गायधने (वय २४)
अंकित तुपकर (वय २४)
हर्षल ठवरे (वय २४)
मोहिनी माहुरकर (वय २४)
शिवानी गिरीपुंजे (वय २४)


हेही वाचा – आता मनसेही तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार


 

First Published on: February 29, 2020 5:33 PM
Exit mobile version