सदाभाऊ खोतांच्या गाडीचा ताफा अडवणाऱ्या हॉटेल मालकावर गुन्हा दाखल

सदाभाऊ खोतांच्या गाडीचा ताफा अडवणाऱ्या हॉटेल मालकावर गुन्हा दाखल

Y level security for sadabhau khot from central government

सदाभाऊ खोत पंचायत राजच्या कामासाठी सांगोल्याच्या दौऱ्यावर असताना हॉटेल मालक अशोक शिंगारे यांनी खोत यांना अडवले होते. त्यांनी भाजप नेते सदाभाऊ खोत यांच्यावर 2014 पासून बिल थकवल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी हॉटेल मालक शिंगारे यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

९ वाजेपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता –

यावर पत्राक परिषदेत सादाभाऊ खोत यांनी मी सरकारी समितीच्या दौऱ्यावर असताना हा प्रकार घडला. त्यामुळे कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करायला हवा होता. मात्र, रात्री ९ वाजेपर्यंत आनंद कुलकर्णी गुन्हा दाखल करायला तयार नव्हते. ते कशाला गुन्हा दाखल करायचा म्हणत होते. त्यांच्यावर कुणाचा दबाव होता याचा शोध घ्यावा लागेल, असे खोत यांनी म्हटले होते.

२०१४ च्या निवडणुकीत कार्यकर्ते घरातील भाकरी बांधून आणत –

सर्व प्रकारावर सदाभाऊ खोत यांनी माहिती दिली. २०१४ च्या निवडणुकीत माझा प्रचार करणारे कार्यकर्ते, पक्षाचे लोक घरातील भाकरी बांधून प्रचार करत होते. माझा एकही कार्यकर्ता त्या काळात हॉटेलमध्ये चहा देखील घेत नव्हता. आमच्याकडे पैसेही नव्हते. २०१४ नंतर मी २०-२५ वेळा सांगोल्याचा दौरा केला. ही व्यक्ती कधीही मला येऊन भेटली नाही आणि काही सांगितले नाही. कोण जेवले, कुणी पाठवले, त्याबाबत काही माहिती आहे का तेही मला आढळून आले नाही, असे सदाभाऊ खोत म्हणाले.

तो व्यक्ती गुन्हेगार –

हा सर्व प्रकार झाला त्यानंतर मी याचा शोध घेतला तर अशोक शिंगारे हा गुन्हेगार आहे असे कळाले. २०२० मध्ये कर्नाटकात सोने चोरीचा गुन्हा या व्यक्तीविरोधात दाखल आहे. या व्यक्तिविरोधात सात गुन्हे दाखल आहेत. तो वाळू माफिया आहे, तो दारू विक्रेता आहे. यानंतर आम्ही याचा सूत्रधार कोण आहे याचाही शोध घेतला. त्या व्यक्तीच्या फोनवर कुणाचे फोन आले, त्याला अटक केल्यावर पोलिसांना कुणी फोन केले त्याचे रेकॉर्ड काढणे गरजेचे आहे, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

First Published on: June 17, 2022 11:55 AM
Exit mobile version