कत्तलीसाठी गायी नेणारे वाहन पकडले; घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा

कत्तलीसाठी गायी नेणारे वाहन पकडले; घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा

Police in Maharashtra s Thane district murdering a 25 year old youth Aakash Thube lives in vasant Vihar area

अस्वली स्टेशन : मोखाडे मार्गे संगमनेरकडे जाणाऱ्या वाहनाची पोलिसांनी बुधवारी  सायंकाळी साडेआठ वाजता वाकी (ता. इगतपुरी) शिवारात तपासणी केली असता कत्तलीसाठी बेशुद्ध करत पाय बांधून गाई नेल्या जात असल्याचे दिसून आले. संबंधितांवर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपनीय सूत्रांनी कत्तलीसाठी जनावरे नेत असल्याची माहिती दिल्यानुसार पोलीस हवालदार अशोक कोरडे, संतोष दोंदे, शीतल गायकवाड, रामकृष्ण लहामटे यांनी वाकी शिवारात सापळा रचून वाहनाची वाट पाहत होते. सायंकाळी साडेआठच्या सुमारास भरधाव मोखाडा-वैतरणा मार्गे येणारी पिकअप (एमएच १५ – बीके- ६३३७) दबा धरून बसलेल्या पोलिसांना दिसताच थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सुसाट वेगाने वाहन पुढे पळवण्याचा प्रयत्न करत असताना इतर ठिकाणी दबा धरून बसलेल्या साध्या वेषातील पोलिसांनी वाहन आडवे लावत वाहनचालक सुमित लाजसा खरात (वय २८, रा. कुरणरोड, संगमनेर) यास वाहनाची झडती घेत पोलिसी खाक्या दाखवत कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांचा परवाना व वैद्यकीय अहवाल मागितला. मात्र, आपण मोखाडा पुलाची वाडी येथून कत्तलीसाठी नेत असल्याचे कबूल केले. वाहनात पाय बांधून इजा उत्पन्न होईल, अशा पद्धतीने तीन गाई व तीन वासरे यांसह पिकअप असा चार लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष दोंदे करत आहेत.
First Published on: July 1, 2020 11:56 PM
Exit mobile version