CBI : वसुली आरोपांवर माजी गृहमंत्र्यांची ९ तास चौकशी, देशमुख म्हणाले…

CBI : वसुली आरोपांवर माजी गृहमंत्र्यांची ९ तास चौकशी, देशमुख म्हणाले…

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटी रूपयांच्या आरोपांबाबत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) मार्फत सलग ९ तास चौकशी झाली. मुंबईतील डीआरडीओ गेस्ट हाऊस येथे सीबीआयच्या टीमसमोर सकाळी ११ वाजता अनिल देशमुख हजर झाले होते. सीबीआयच्या टीमने अनिल देशमुख यांचा जबाब दिवसभराच्या प्रश्नोत्तरामध्ये नोंदवून घेतला. दिवसभर चाललेल्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना सायंकाळी ६ वाजता चौकशी पुर्ण झाल्यानंतर अनिल देशमुख या कार्यालयातून बाहेर पडले. अनिल देशमुख यांना सीबीआयमार्फत दोन दिवसांपूर्वीच समन्स देण्यात आला होता. त्यामुळेच सीबीआयच्या मुंबईतील मुख्यालयात अनिल देशमुख यांनी हजेरी लावली होती. पण नऊ तास चाललेल्या चौकशीत परमबीर सिंह यांनी केलेले बहुतांश आरोप हे अनिल देशमुख यांनी फेटाळल्याची माहिती आहे.

काय आहे नेमक प्रकरण ?

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलेल्या लेटर बॉम्बमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रात केला होता. तसेच सचिन वाझे या एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याच्या पोलिस दलातील पुर्ननियुक्तीसाठीही दोन कोटी रूपये मागितल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केला होता. या भ्रष्टाचाराज्या प्रकरणाची चौकशी ही सीबीआयकडून व्हावी अशी मागणी अॅडव्होकेट जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयासमोर दाखल केलेल्या याचिकेत केली होती. त्यानुसारच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. त्याचाच भाग म्हणून सीबीआयने दोन दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांना समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. अनिल देशमुख यांनी या समन्सनुसारच मुंबईतील सीबीआयच्या डीआरडीओ गेस्ट हाऊस येथे चौकशीला आज हजेरी लावली. अनिल देशमुख यांच्यावर झालेले कोट्यावधी रूपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप पाहता, या संपुर्ण प्रकरणात अनिल देशमुख यांना पुन्हा चौकशीसाठी सीबीआयकडून बोलावण्याची शक्यता आहे. तसेच या संपुर्ण प्रकरणात सीबीआयकडून माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचीही चौकशी होऊ शकते.

परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपानुसार एपीआय सचिन वाझे यांना अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना बार आणि रेस्टॉरंटकडून महिन्याला १०० कोटी रूपयांचे टार्गेट देण्यात आले होते असा आरोप केला होता. तर सीबीआयने याआधीच सचिन वाझे यांची चौकशी करण्यासाठी नॅशनल इनवेस्टीगेशन एजन्सी (NIA) कोर्टाकडे परवानगी मागितली होती. या परवानगीसाठी एनआयएच्या टीमसोबत ठरवून चौकशी करा असे कोर्टाने स्पष्ट केले होते. त्यामुळेच नजीकच्या काळात सचिन वाझे यांनाही चौकशीसाठी सीबीआयकडून बोलावण्यात येईल असे कळते.

कशी झाली चौकशी ? काय घडलं?

सीबीआयचे पोलिस अधिक्षक दर्जाचे अधिकारी आयपीएस अभिशेक दुलार आणि किरण एस यांच्याकडून राज्याचे माजी गृहमंत्री अनि देशमुख यांची चौकशी झाली. 100 कोटी वसुली प्रकरणात सीबीआयकडून सुरू असलेल्या प्राथमिक तपासात झाली अनिल देशमुखांची चौकशी पुर्ण झाली असे कळते. सकाळी 10 वाजल्यापासून कलिना मधल्या डीआरडीओच्या कार्यालयात सुरू होती चौकशी. देशमुखांची आज तब्बल साडेआठ तास चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान अनिल देशमुखांनी बहुतांश आरोप फेटाळले. त्यांच्यावर झालेले सर्व आरोप तथ्यहीन आणि चूकीचे असल्याचा देशमुखांचा दावा सूत्रांची माहिती. महाराष्ट्राला आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचा काही अधिका-यांचा हा प्रयत्न आहे असेही देशमुख म्हणाले. देशमुखांनी अनेक प्रश्नांना दिले उत्तर “मला माहित नाही, माझी काहीही संबंध नाही. परमबीर सिंग यांची बदली केल्याने त्यांनी पत्र लिहून आरोप केल्याचं देशमुखांनी यावेळी म्हणणे मांडले. डीसीपी राजू भूजबळ आणि एसीपी संजय पाटील यांनी त्यांच्या जबाबात स्पष्ट केलय मी त्यांना कोणतिही वसूली करायला सांगितले नाही. मुंबई पोलिसांनी केलेल्या अंतर्गत चौकशीत जी बाब समोर आलीय त्यामुळे या आरोपांमध्ये तथ्य नाही अस देशमुख यांनी सीबीआय चौकशीत म्हटल्याच सूत्रांची माहिती आहे.


 

First Published on: April 14, 2021 7:31 PM
Exit mobile version