अनिल देशमुखांचा जावई गौरव चतुर्वेदीची सीबीआयकडून चौकशी

अनिल देशमुखांचा जावई गौरव चतुर्वेदीची सीबीआयकडून चौकशी

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडी चौकशी सुरु आहे. मात्र देशमुखांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयनं ताब्यात घेत २० मिनिटे चौकशी केली आहे. सीबीआयने चतुर्वेदींची धावती चौकशी घेऊन त्यांना पुन्हा सोडलं आहे. अनिल देशमुखांच्या कुटुंबीयांनी १० जणांनी जावई गौरव चतुर्वेदी यांचे अपहरण केलं असल्याचा आरोप केला होता. वरळीतील सुखदामधूम गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेतलं होतं. सीबीआयच्या १० जणांच्या टीमनं ही कारवाई करत गौरव चतुर्वेदी यांना चौकशीसाठी कार्यालयात आणलं होते. अनिल देशमुख यांच्याविरोधात १०० कोटी भ्रष्टाचार आरोप करण्यात आला असून याची चौकशी ईडी करत आहे. या प्रकरणासंबंधीतच सीबीआयनं चौकशी केली असल्याची माहिती मिळाली आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि त्यांच्या कायदेशीर सल्लागार टीम मधील एकाला सीबीआयने चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर येत आहे, मात्र सीबीआयकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. गौरव चतुर्वेदी यांची २० मिनिटे चौकशी केल्यानंतर सीबीआयकडून त्यांना सोडून देण्यात आले. परंतु त्यांचे वकील आनंद ढगे यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी वरळीतील सुखदामध्ये आले होते. सुखदामधून परतत असताना गौरवर यांची गाडी वरळी परिसरात सी-लिंक जवळ अडवून ताब्यात सीबीआयनं ताब्यात घेतलं होते. सुरुवातील देशमुख कुटुंबियानी गौरव चतुर्वेदी यांचे अपहरण झालं असल्याचा आरोप केला होता. यानंतर गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. देशमुखांच्या वकिलांनाही सीबीआयनं ताब्यात घेतलं असल्याची माहिती देण्यात आली होती.

सचिन सावंतांची भाजपवर टीका

अनिल देशमुखांच्या जावयावर करण्यात आलेल्या कारवाईवरुन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे. सचिन सावंत यांनी म्हटलं आहे की, केंद्रीय तपास यंत्रणांनी आज अनिल देशमुख यांचे जावई आणि त्यांच्या वकिलांना कुठल्याही नोटीसीशिवाय उचलून नेले असे कळते. हे अत्यंत गंभीर आहे. “देशात मोदीशाही चालू आहे. नियम कायदे गुंडाळले गेले आहेत. हम कहे सो कायदा आहे ” असे मोदी सरकारने अधिकृतपणे जाहीर करून टाकावे. असे म्हणत सचिन सावंत यांनी या कारवाईचा जाहीर निषेध केला आहे.


हेही वाचा : १२ आमदारांबाबत लवकरच निर्णय; राज्यपालांच्या भेटीनंतर अजित पवारांची माहिती


 

First Published on: September 1, 2021 9:59 PM
Exit mobile version