Anil Deshmukh corruption case: भ्रष्टाचारप्रकरणी अनिल देशमुख अन् सचिन वाझेंसह कुंदन शिंदेंना सीबीआय आज ताब्यात घेणार

Anil Deshmukh corruption case: भ्रष्टाचारप्रकरणी अनिल देशमुख अन् सचिन वाझेंसह कुंदन शिंदेंना सीबीआय आज ताब्यात घेणार

मुंबई : भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआय महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, निलंबित पोलीस सचिन वाझे आणि कुंदन शिंदे यांना आज ताब्यात घेणार आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरुद्ध दाखल झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी करणारी केंद्रीय अन्वेषण विभागाची (CBI) याचिका मुंबई न्यायालयाने गुरुवारी स्वीकारली होती. सीबीआयनं त्यांच्या कोठडीची विनंती केली होती. त्यानुसार आता सीबीआय त्यांचा ताबा घेणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख (71) आणि त्यांचे दोन सहकारी संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे सध्या अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) चौकशी होत असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत.

सीबीआयने गुरुवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. पी. सिंगाडे यांच्यासमोर अर्ज दाखल केला. याद्वारे सीबीआयने मनी लाँड्रिंग प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या विशेष पीएमएलए न्यायालयाला देशमुख आणि त्यांच्या दोन साथीदारांना भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांच्या कोठडीत पाठवण्याची विनंती केली.


न्यायमूर्ती सिंगाडे यांनी सीबीआयचा अर्ज स्वीकारला आणि संबंधित न्यायालयांना विनंतीचे पत्र दिले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये आरोप केला होता की, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांना शहरातील रेस्टॉरंट्स आणि बारमधून दरमहा 100 कोटी रुपये उकळण्याचे टार्गेट दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने देशमुख यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला होता.


हेही वाचाः मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, पत्नी आता आपल्या पूर्व पतीला देणार दरमहा 3 हजार पोटगी

First Published on: April 1, 2022 11:38 AM
Exit mobile version