वाढीव मका खरेदीला अखेर केंद्राची मान्यता

वाढीव मका खरेदीला अखेर केंद्राची मान्यता

मका खरेदीचे उद्दीष्ट पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकारने बंद केलेली खरेदी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मागणीनंतर अखेर सुरू करण्यात आली आहे. खासदार डॉ. भारती पवार यांच्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी या वाढीव खरेदीला मान्यता दिली.

उद्दीष्ट पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकारनं मका खरेदी थांबवली होती. मात्र, शेतकर्‍यांकडे अजूनही चांगल्या प्रतीचा मका शिल्लक असल्यानं मका खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकर्‍यांकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर खासदार डॉक्टर भारती पवारांनी केंद्राकडे वाढीव मका खरेदीची मागणी केली. राज्याच्या वाढीव मका आणि ज्वारी धान्य खरेदी वितरण आराखडा केंद्राला सादर करण्यात आला होता. त्यावर तत्परतेनं पाऊलं उचलत केंद्र सरकारनं राज्य सरकारच्या वाढीव धान्यखरेदीला मंजुरी दिली. वाढीव मकाखरेदीसाठी खासदार डॉक्टर भारती पवारांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर दानवेंनी वाढीव मका खरेदीला परवानगी दिली. या निर्णयामुळे मका उत्पादक शेतकर्‍यांनाही मोठा दिलासा मिळालाय.

First Published on: January 12, 2021 6:09 PM
Exit mobile version