आघाडीने राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आरोप

आघाडीने राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आरोप

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले आहे. सामुहिक बलात्कारासारख्या घटनांचेही या सत्ताधारी आघाडीला काही वाटत नाही इतके हे सरकार संवेदनाशून्य झाले आहे, असा आरोप करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी राज्यातील आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र संघर्ष करण्याचे आवाहन भाजपच्या पडाधिकाऱ्यांना केले.

त्रिपुरात जी घटना घडली नाही तिच्या अफवेवरून मालेगाव, अमरावती, नांदेड येथे दंगली होतात. त्यासाठी पंधरा – वीस हजार लोक रस्त्यावर येतात आणि पोलिसांवर हल्ला करतात याचीही आघाडीला चिंता नाही. त्यानंतर हिंदूंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली तरीही भाजपावर आरोप करतात. अंमलीपदार्थांचे समर्थन केले जाते आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी स्थिती झाली असताना आपल्याला संघर्ष चालू ठेवायचा आहे, असेही पाटील म्हणाले.

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज पार पडली. या बैठकीच्या उद्घाटन सत्रात बोलताना पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले.

सत्ताधारी महाविकास आघाडीने राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले आहे. जवळ जवळ सर्व प्रकारच्या गुन्ह्यांशी कोणत्या ना कोणत्या मंत्र्याचे नाव जोडले गेले आहे. राज्यात सामुहिक बलात्काराच्या दुःखदायक घटना घडत आहेत. पण महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्याचे काही वाटत नाही, अशी टीका त्यांनी केली.


हेही वाचा: किरीट सोमय्यांनी १५ दिवसानंतर अमरावतीत यावं, यशोमती ठाकुर याचं सोमय्यांना आव्हान


हिम्मत असेल तर सरकार बरखास्त करा

राज्यातील जनतेने २०१९ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मते दिली. पण शिवसेनेने विश्वासघात केला. आता राज्याला पार्टटाईम मुख्यमंत्री आहेत.

First Published on: November 16, 2021 7:56 PM
Exit mobile version