शरद पवारांचा एकेरी उल्लेख अनावधानाने, चंद्रकांत पाटलांकडून दिलगिरी व्यक्त

शरद पवारांचा एकेरी उल्लेख अनावधानाने, चंद्रकांत पाटलांकडून दिलगिरी व्यक्त

शरद पवारांचा एकेरी उल्लेख अनावधानाने, चंद्रकांत पाटलांकडून दिलगिरी व्यक्त

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला होता. पवारांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टीकास्त्र डागलं होते. चंद्रकांत पाटील यांनी आपली जीभ घसरल्याचे सांगून दिलगिरी व्यक्त केली आहे. एका क्षणाला जीभ घसरली आणि अनावधानाने उल्लेख झाला असे पाटील यांनी सांगून आपली चूक झाल्याचे मान्य केलं आहे. पाटलांनी आपली चूक झाल्याचे म्हटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांनी जीभ घसरली मात्र आता पाय घसरला जाऊ नये याची काळजी घ्यावी अशी टीप्पणी केली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमादरम्यान बोलताना शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला होता. यावरुन राज्यात खळबळ माजली होती. चंद्रकांत पाटील यांनी काही तासांमध्येच त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देऊन वाद मिटवला आहे. चंद्रकांत पाटलांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, परवा सांगलीच्या कार्यक्रमामध्ये अनावधानाने शरद पवार यांच्याबद्दल एकेरी उल्लेख आला. सार्वजनिक कार्यक्रम नव्हता घरगुती कार्यक्रम होता. शरद पवार विरोधक असले तरी अनादर कधीच नाही. आमच्यामध्ये भांडणही नाही. अनेकवेळा त्यांची स्तुती करताना म्हणत असतो प्रमोद महाजन यांनी सांगितले होते की, शरद पवार यांनी मुख्यमंत्री होत असताना ४० गोष्टी लिहून काढल्या होत्या त्यातील ३८ गोष्टी पूर्ण केल्या आहेत. शरद पवारांबद्दल माझ्या मनात आदरच आहे. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. महाराष्ट्रातील विकासात योगदान असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

पाय घसरु देऊ नका

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. अनावधानाने शरद पवारांचा उल्लेख केला असल्याचे पाटील यांनी सांगितले. क्षणासाठी जीभ घसरली परंतु कधीही शरद पवारांचा अनाधार केला नाही हे देखील पाटलांनी सांगितले. यावर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी चूक मान्य केली ते ठीक आहे. त्यांची जीभ घसरली परंतु आता पाय घसरायला जाऊ नये याची त्यांनी काळजी घ्यावी असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.


हेही वाचा : महापालिकेतील नेतृत्वावर भाजप नगरसेवक नाराज, लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार – यशवंत जाधव


 

First Published on: October 18, 2021 10:32 PM
Exit mobile version