घरमुंबईमहापालिकेतील नेतृत्वावर भाजप नगरसेवक नाराज, लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार - यशवंत जाधव

महापालिकेतील नेतृत्वावर भाजप नगरसेवक नाराज, लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार – यशवंत जाधव

Subscribe

शिवसेनेचे उपनेते आणि स्थासी समिती अध्यक्ष यांनी भाजपचे १५ ते २० नगरसेवक कंटाळल्याचा व शिवसेनेत प्रवेश करण्याचा दावा केला होता.

मुंबई महानगरपालिकेतील नेतृत्वावर नाराज असलेले भाजप नगरसेवक डिसेंबर २०२१ मध्ये शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला आहे. मुंबई शहराला लवकरच याबद्दल कळेल असा दावाही जाधव यांनी केला आहे. भाजपमध्ये असलेल्या नगरसेवकांना न जुमानता नेतृत्वाचा मनमानी कारभार सुरू आहे. यामुळे हे नगरसेवक नाराज असून आपल्या संपर्कात असल्याचेही यावेळी जाधव यांनी सांगितले. तसेच सध्या हे नगरसेवक यावर विचार करत असून लवकरच निर्णय घेतील असे सांगत जाधव यांनी भाजपचे १५ ते २० नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचेही यावेळी सांगितले आहे.

जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की मुंबई महानगरपालिकेत असलेले भाजपचे काही नगरसेवक त्यांच्या नेतृत्वाला कंटाळले आहेत. नेतृत्वाचा मनमानी कारभार सुरू असून नगरसेवकांना विचारात न घेता त्यांना डावलले जात आहे. यामुळे नगरसेवकांमध्ये अस्वस्थतता आहे. परिणामी अशी मंडळी जी महानरपालिकेच्या नेतृत्वावर नाराज आहे. ती निश्चित वेगळा विचार करत आहेत. डिसेंबरला मुंबई शहराला याबद्दल कळेल. भाजपची ही मंडळी शिवसेनेच्या संपर्कात आहेत. ते भाजपला कंटाळले आहेत. जे नेतृत्व आहे ते त्यांना जुमानत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिवसेनेचा आधार घेण्यासाठी ती मंडळी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे यशवंत जाधव यांनी यावेळी म्हटलं आहे.

- Advertisement -

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू आहे. तसेच विकासकामांवर आरोप-प्रत्युरोप सुरु झाले आहे. शिवसेनेची सत्ता घालवण्यासाठी आणि महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजप रणनिती आखत आहे. भाजपचे नगरसेवक फुटण्याची भीती असल्यामुळे वरिष्ठ नेत्यांकडून धमकावलं जात आहे. नेतृत्वाच्या अशा मनमानी कारभारामुळे नगरसेवकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यामुळे लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -