Petrol Diesel Price: केंद्रानंतर राज्य सरकार इंधनाचे दर कमी करेल ऐवढी दानत नाही, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

Petrol Diesel Price: केंद्रानंतर राज्य सरकार इंधनाचे दर कमी करेल ऐवढी दानत नाही, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

केंद्र सरकारने ऐन दिवाळीत चांगला निर्णय घेतला असून यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरात कपात केल्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर ५ आणि १० रुपयांनी घसरले आहेत. केंद्र सरकारने निर्णय घेतल्यानंतर अनेक भाजप शासित राज्यांनी व्हॅट कमी केला आहे. परंतु केंद्रानंतर राज्यातील महाविकास आघाडीने अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. यावरुन केंद्राने केल्यावर राज्य सरकार इंधन दर कपात करेल अशी त्यांची दानत नाही असा घणाघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना पेट्रोल डिझेलच्या दरावरुन राज्य सरकारवर घणाघात केला आहे. केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये ५ रुपये तर डिझेलमध्ये १० रुपयांनी घट केली आहे. यानंतर भाजपशासित राज्यांनीही व्हॅट कमी केल्यामुळे पेट्रोलचे दर १२ ते १७ रुपयांची स्वस्त झाले आहेत. महाराष्ट्रातही राज्य सरकारने व्हॅट कमी केला तर राज्यातील नागिरकांना पेट्रोल डिझेलच्या दरात १४ ते १७ रुपयांची सूट मिळण्याची शक्यता आहे. परंतु राज्य सरकार असे कऱणार नाही कारण त्यांची तेवढी दानत नाही. राज्य सरकार नेहमी केंद्राकडे बोट दाखवत आले आहे, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं.

राज्य सरकार व्हॅटमध्ये घट करेल का असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना करण्यात आला यावर ते म्हणाले की, आपल्या राज्याचे लसीकरण राज्यानेच करण्याचे ठरलं तेव्हा राज्य सरकारने ६ हजार कोटीचा चेक दाखवला होता परंतु तो चेक आता कुठे गेला ते माहिती नाही. ते सुद्धा केंद्राने केलं आहे.

राज्याने पेट्रोल डिझेलचा व्हॅट कमी केला पाहिजे होता तो कमी केला नाही सतत केंद्रावर ढकलत राहिले शेवटी केंद्राने त्यांचा एक्साईज ड्यूटी कर कमी केला आहे. त्यामुळे आजपासून पेट्रोल डिझेलचे दर हे ५ आणि १० रुपयांनी कमी झाले आहेत. अपकार कर, एक्साईज कर कमी केल्यामुळे देशात पेट्रोल डिझेलचे दर कमी झालेत त्यामुळे आपणही करु अशी राज्य सरकारची दानत नाही असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.


हेही वाचा : भाजपशासित राज्यांत पेट्रोलचे दर १२ ते १५ रुपयांनी घसरले, महाराष्ट्राचं काय?


 

First Published on: November 4, 2021 10:56 AM
Exit mobile version