घरताज्या घडामोडीPetrol Diesel Price Drop: भाजपशासित राज्यांत पेट्रोलचे दर १२ ते १५ रुपयांनी...

Petrol Diesel Price Drop: भाजपशासित राज्यांत पेट्रोलचे दर १२ ते १५ रुपयांनी घसरले, महाराष्ट्राचं काय?

Subscribe

दिवाळी सणाच्या निमित्ताने केंद्र सरकारने देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करुन सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच दिलासा दिला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर भाजपशासित राज्यांनीही मोठा निर्णय घेऊन राज्यांतील नागिरकांना चांगलाच दिलासा दिला आहे. तर बिगर भाजप शासित राज्यांमध्ये अद्याप पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्यात आली नाही. ज्या राज्यांनी केंद्राच्या निर्णयानंतर दर कपात केले तेथील पेट्रोल डिझेलचे दर हे १२ ते १७ रुपयांपर्यंत घसरले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर १२-१२ रुपयांनी घटले आहेत.

केंद्र सरकारने बुधवारी दिवाळीच्या पूर्वसंध्येला पेट्रोलच्या किंमतीमध्ये ५ रुपये तर डिझेलच्या किमतीमध्ये १० रुपयांची घट केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीची भेट दिली असल्याचे भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तसेच आता मोदींच्या निर्णयानंतर भाजपचे ज्या राज्यात सरकार आहे तेथील राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरील वॅट कमी केला आहे. राज्य सरकारांनी तात्काळ व्हॅट कमी केला असल्यामुळे दरात आणखी कपात होऊन १० ते १५ रुपयांची सूट देण्यात आली आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने पेट्रोल ढिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर भाजप शासित राज्यांनी लगेच व्हॅट कमी केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोलवर ७ रुपये व्हॅट कमी झाला आहे. तर डिझेलवरील दर दोन रुपयांनी कमी करण्यात आला. यामुळेच उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल डिझेलचे दर १२-१२ आहे. उत्तर प्रदेशपाठोपाठ कर्नाटक, गोवा,त्रिपुरा आणि आसाम सरकारने व्हॅट ७ रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे त्या राज्यांमध्ये डिझेल प्रति लिटर १७ रुपये आणि पेट्रोलच्या दरात १२ रुपयांची घट होणार आहे.

- Advertisement -

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनीसुद्धा पेट्रोल डिझेलवरली व्हॅट कमी करण्याची घोषणा केली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये डोंगराळ भागातील लोकांना याचा चांगला फायदा होणार असल्याचे ठाकूर यांनी म्हटलं आहे. तर बिहारच्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा व्हॅट कमी करण्याची घोषणा केली आहे. पेट्रोलवर १ रुपय ३० पैस आणि डिझेलवर ९० पैसे सवलत देणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे तेथील जनतेला केंद्र सरकारची कपात पकडून पेट्रोलवर ६.३० रुपयाची सूट तर डिझेलवर ११.९० रुपयांची सवलत मिळेल.

महाराष्ट्रात व्हॅटमध्ये अद्याप दिलासा नाही

केंद्राच्या निर्णायानंतर भाजपशासित राज्यांमध्ये व्हॅटमध्ये कपात करण्यात आली आहे. यामुळे केंद्र सरकारने केलेली कपात आणि राज्यांनी केलेली कपात पकडून १२ ते १७ रुपयांपर्यंतचा दिलासा नागरिकांना भेटला आहे. अशाच प्रकारचा निर्णय महाराष्ट्रात घेतल्यास नागरिकांना चांगला दिलासा मिळेल आणि महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये १० ते १२ रुपयांची कपात होईल.


हेही वाचा : केंद्राकडून पेट्रोल-डिझेल दर कपात, काँग्रेसचा भाजपवर खोचक निशाणा


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -